समताच्या अन्नपूर्णा व समाजसेविका सौ.सुहासिनी कोयटे यांचा गौरव
कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे


समताच्या अन्नपूर्णा व समाजसेविका सौ.सुहासिनी कोयटे यांना गौरव

कोपरगाव : आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव येथील कोपरगाव नगरपालिकेच्या माजी महिला पहिल्या नगराध्यक्षा व समता महिला बचत गटाच्या अध्यक्षा, समता इंटरनॅशनल स्कूल मधील आस्वाद मेस विभागाच्या अध्यक्षा ‘अन्नपूर्णा’ म्हणून ओळख मिळविलेल्या समाजसेविका सौ.सुहासिनी ओमप्रकाश कोयटे यांना नाशिक येथील प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या वतीने ‘ब्रम्हाकुमारीज नारी शक्ती पुरस्कार २०२५’ या पुरस्काराने गौरविण्यात आले.
नाशिक येथील प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या कोपरगाव येथील केंद्रात राजयोगिनी ब्रम्हाकुमारी सरला दिदी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या समारंभात सौ.सुहासिनी कोयटे यांनी सामाजिक, सहकार व शैक्षणिक क्षेत्रात महिलांच्या उत्थानासाठी केलेल्या उल्लेखनीय व दैदिप्यमान कार्याबद्दल ब्रह्माकुमारीज नारी शक्ती पुरस्कार २०२५ मिळाला आहे.
सन्मानचिन्ह, सन्मानपत्र आणि शाल असे या पुरस्काराचे स्वरूप असून सन्मानपत्रावर महिलांच्या उत्थानासाठी केलेल्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख आहे. तसेच नाशिक येथील राजयोगिनी ब्रह्माकुमारी वासंती दिदी यांची सन्मानपत्रावर स्वाक्षरी आहे.
या कार्यक्रमात देर्डे चांदवड च्या सरपंच सौ.प्रतिभा गायकवाड , उपसरपंच सौ.शकुंतला कोल्हे, देर्डे को-हाळे येथील पोलीस पाटील सौ.विद्या डुबे , श्री साई वात्सल्य ट्रस्ट संस्थापिका रत्ना चांदगुडे, एकल महिला समितीच्या सौ.संगिता मालकर, समाजसेविका सुनयना केळकर यांना ही पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्योती दिदी यांनी केले. या वेळी ॲड.अशोकराव टुपके, ब्रह्माकुमारी आश्रमचे कॉन्ट्रॅक्टर सिव्हिल इंजिनियर शैलेश आसने, डॉ. नानासाहेब होन, सतीश पवार, निवारा परिसरातील सौ.ज्योत्स्ना पटेल, मीना व्यास, श्रीमती रजनी नलगे, हर्षदा पटवर्धन, मंगल साळुंखे, जयश्री शेटे, शालिनी कांगुने, कल्पना हिंगमिरे, प्रीती साखरे, छाया सोनेकर, रजनी भुसारे, वंदना निळकंठ, मनीषा घोडके, उज्वला सरडे, बैरागीताई, कर्डकताई आदी महिला उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन चैताली दिदी व उपस्थितांचे आभार राची दिदी यांनी मानले.



