देश-विदेशब्रेकिंगमहाराष्ट्र

सिंधुदुर्गनगरी येथील पतपेढीची समता मुख्य कार्यालयास सदिच्छा भेट

कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे

सिंधुदुर्गनगरी येथील पतपेढीची समता मुख्य कार्यालयास सदिच्छा भेट

कोपरगाव : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील सिंधुदुर्गनगरी येथील सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढीच्या पदाधिकाऱ्यांनी व संचालकांनी राज्यातील अग्रगण्य समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयास २६ डिसेंबर २०२५ रोजी सदिच्छा भेट दिली.
या भेटीदरम्यान पतपेढीचे अध्यक्ष चंद्रसेन कृष्णा पाताडे, उपाध्यक्ष महेंद्र महादेव पावस्कर, संचालक विजय भगवान सावंत, संतोष दत्तात्रय राणे, दयानंद सखाराम नाईक, सचिन नामदेव बेर्डे, सिताराम राया लांबर, मंगेश विनायक कांबळी, श्रीकृष्ण नारायण कांबळी, तज्ञ संचालक किशोर देऊ कदम, लेखापाल मनोज श्रीकृष्ण सावळ, लिपिक लक्ष्मण रमाकांत कसाबले, गुरुदत्त नारायण दळवी आदी मान्यवर उपस्थित होते. समता पतसंस्थेचे चेअरमन ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे व ठेव विभाग प्रमुख संजय पारखे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
प्रसंगी ठेव विभाग प्रमुख संजय पारखे यांनी समता पतसंस्थेने ग्राहक हितासाठी वापरात आणलेल्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाची सविस्तर माहिती दिली. पेपरलेस व सेल्फ बँकिंग प्रणाली, प्रभावी वसुली पॅटर्न, मोबाईल बँकिंग सुविधा, तसेच सोने तारण कर्ज वितरण प्रक्रिया याविषयी त्यांनी अतिशय सोप्या भाषेत मार्गदर्शन केले.

तसेच समता महिला बचत गटांच्या माध्यमातून महिलांना रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या सहकार उद्योग मंदिर आणि त्या ठिकाणी उत्पादित होणाऱ्या वस्तूंच्या विक्रीसाठी उभारण्यात आलेल्या समताज सहकार मिनी मॉलची माहितीही देण्यात आली.

यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढीचे संचालक विजय सावंत यांनी समता संस्थेकडून मिळालेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल समाधान व्यक्त करत संस्थेचे आभार मानले. समता पतसंस्थेचे अत्याधुनिक तंत्रज्ञान, विविध योजना व सामाजिक उपक्रमांचे त्यांनी विशेष कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे