समताच्या कर्मचाऱ्यांच्या अंगी असलेल्या प्रामाणिकपणाचा प्रत्यक्षात प्रत्यय – सौ सुनिता दुगल,ग्राहक
समता वार्ता कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे
समताच्या कर्मचाऱ्यांच्या अंगी असलेल्या प्रामाणिकपणाचा प्रत्यक्षात प्रत्यय – सौ सुनिता दुगल,ग्राहक
कोपरगाव : समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या श्रीरामपूर शाखेची गेली अनेक वर्षापासून मी ग्राहक असून समतात ग्राहकाला त्वरीत मिळणारी सेवा आणि समताचे चेअरमन काका कोयटे व संचालक मंडळाच्या मार्गदर्शनाखाली सेवा देणारे सर्वच कर्मचारी कौतुकास पात्र असून त्यांच्यातील शिस्त आणि अंगी असलेल्या प्रामाणिकपणाचा प्रत्यय आज अनुभवातून मिळाला आहे. यामुळे समतावरील विश्वास अजून वाढला असून आम्हा ग्राहक व सभासदांच्या ठेवींना अभेद्य सुरक्षा कवचाच्या माध्यमातून सुरक्षितता प्रदान करणारी महाराष्ट्रातील अग्रगण्य पतसंस्था आहे.असे भावनिक गौरवोद्गार श्रीरामपूर शाखेच्या ग्राहक सौ सुनीता श्रीराम दुगल यांनी काढले.
समता पतसंस्थेच्या श्रीरामपूर शाखेत २१ जानेवारी २०२२ रोजी सौ सुनिता दुगल एम.एस.सी.बी.चे वीज बील भरण्यासाठी शाखेत आल्या असता त्याच्या जवळ असणारी ३० हजाराची रक्कम विसरून शाखेतच राहिली. श्रीरामपूर शाखेच्या शिपाई कर्मचारी सौ रंजना लोंढे यांना ती रक्कम सापडली, त्यांनी ती रक्कम शाखाधिकारी श्री फारुख शेख यांच्या कडे दिली. त्यांनी चौकशी करून ती रक्कम सौ सुनिता दुगल यांना बोलावून देण्यात आली. प्रसंगी त्या बोलत होत्या.यावेळी उपविभागीय अधिकारी श्री सोपान पठारे,उपशाखाधिकारी श्री भरत कर्णावट ,कर्मचारी ग्राहक, सभासद आणि हितचिंतक उपस्थित होते.
समता नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे व संचालक मंडळ, मुख्य कार्यालयाचे पदाधिकारी, अधिकारी आदींनी सौ रंजना लोंढे व सर्वच कर्मचाऱ्यांचे कौतुक करत शाबासकी दिली.