ग्राहकांना दिली जाणारी तत्पर सेवा आणि पारदर्शक व्यवहार ही समताची खरी ओळख – श्री सतीश घोरपडे,जनरल मॅनेजर
समता वार्ता कार्यकारी संपादक पोपट साळवे
ग्राहकांना दिली जाणारी तत्पर सेवा आणि पारदर्शक व्यवहार ही समताची खरी ओळख – श्री सतीश घोरपडे,जनरल मॅनेजर
कोपरगाव : समता पतसंस्था आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सभासद,ग्राहकांना तत्पर सेवा देत असून ग्राहकांशी केला जाणारा व्यवहार पारदर्शक आहे हीच महाराष्ट्रातील समताची खरी ओळख तयार झाली आहे तसेच समताच्या योजना आणि उपक्रम देखील सभासद हिताची आहे.असे प्रतिपादन दि गुजराथी अर्बन को.ऑप क्रेडिट सोसायटीचे जनरल मॅनेजर श्री सतीश घोरपडे यांनी केले.सातारा येथील दि गुजराथी अर्बन को.ऑप क्रेडिट सोसायटीचे जनरल मॅनेजर श्री सतीश घोरपडे, प्रशासकीय अधिकारी श्री आशिष दळवी, शाखाधिकारी सौ चैताली केळकर,लिपिक श्री गणेश शिंदे,सौ वर्षा चिंचने,सौ संध्या साबळे,सौ आसावरी रानडे आदी पदाधिकाऱ्यांनी कोपरगाव येथील समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयास १३ नोव्हेंबर २०२१ रोजी सदिच्छा भेट दिली.
प्रसंगी समतातील आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापर करून मोबाइल बँकिंग, पेपरलेस बँकिंग, ऑडिट कंट्रोल रूम, समता रिकव्हरी पॅटर्न,सोनेतारण विभाग तसेच मुख्य कार्यालयातील कामकाजाची चर्चा समता पतसंस्थेचे चेअरमन ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांच्याशी केली.
प्रत्यक्षात मुख्य कार्यालयाची माहिती,संस्थेतील आधुनिक तंत्रज्ञान, व्हाऊचरलेस बँकिंग, सोनेतारण विभाग, कर्ज विभाग यांविषयी संस्थेचे ऑडिट कंट्रोल रूम प्रमुख श्री संजय पारखे यांनी सविस्तर माहिती दिली तर कोपरगाव शाखेतील मोबाईल बँकिंग,पेपरलेस बँकींग याविषयी सविस्तर माहिती कोपरगाव शाखेचे शाखाधिकारी श्री आप्पासाहेब कोल्हे यांनी दिली.
उपस्थित पदाधिकाऱ्यांचा सत्कार संस्थेचे चेअरमन ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांच्या हस्ते समता महिला बचत गटाच्या माध्यमातून अगरबत्ती व कापूर एकत्र बांधून तयार करण्यात आलेला गुच्छ देऊन करण्यात आला. उपस्थित पदाधिकाऱ्यांनी समता पतसंस्थेविषयी मिळालेल्या माहितीबद्दल समाधान व्यक्त करत समताचे पदाधिकारी,अधिकारी यांनी दिलेली अनमोल माहिती आणि बहुमोल वेळ दिल्याबद्दल आभार मानले आणि समताच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देत निरोप घेतला.