ब्रेकिंगमहाराष्ट्र

बसवरत्न गौरव पुरस्काराने काका कोयटे यांचा सन्मान

कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे

बसवरत्न गौरव पुरस्काराने काका कोयटे यांचा सन्मान

कोपरगाव : धाराशिव जिल्ह्यातील उमरगा येथील बसव रत्न बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने महाराष्ट्रातील वीरशैव लिंगायत समाजात सर्वोच्च समजला जाणारा २०२४ चा ‘बसव रत्न गौरव पुरस्कार’ वीरशैव इंटरनॅशनल असोसिएशनचे अध्यक्ष व लिंगायत संघर्ष समितीचे मुख्य समन्वयक, अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात वास्तव्य असलेले ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांना सदधर्मपीठ उज्जैनचे सिंहसिनाधिश्वर श्री श्री श्री १००८ जगद्गुरु सिद्धलिंगराज देशीकेंद्र शिवाचार्य भगदपाद महास्वामी यांच्या हस्ते व माजी मंत्री बसवराज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली १ जानेवारी २०२४ रोजी धाराशिव जिल्ह्यातील उमरगा या ठिकाणी भव्य दिव्य व दिमागदार सोहळ्यात प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

वीरशैव लिंगायत समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात येत असतो. महाराष्ट्रभर कार्यरत असलेल्या वीरशैव इंटरनॅशनल असोसिएशन व लिंगायत संघर्ष समिती या संघटनांच्या माध्यमातून प्रमुख पदावर काम करून महाराष्ट्रातील वीरशैव लिंगायत समाजाचा सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, आर्थिक विकास करण्याच्या दृष्टीने विविध पावले उचलून मिळालेल्या यशामुळे काका कोयटे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.

विशेषतः वीरशैव लिंगायत समाजातील १४ पोट जातींना कराड येथे केलेल्या ६ दिवसाचे आमरण उपोषणामुळे वीरशैव लिंगायत समाजातील लाखो सुशिक्षित बेरोजगार, शासकीय सेवेतील अधिकारी, कर्मचारी आदींना या आरक्षणाचा फायदा झालेला आहे.

कार्यक्रमाला पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर ट्रस्टचे सह अध्यक्ष ह.भ.प.श्री.गहिनीनाथ महाराज औसेकर, हिरेमठ संस्थानचे आळंदी येथील श्री.श्री. १०८ सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी, औसा येथील श्री.श्री.१०८ शांतवीरलिंग शिवाचार्य महास्वामी, कासारशिरसी येथील करीबसवेश्वर मठाचे मुरगेंद्र महास्वामी यांची प्रमुख उपस्थिती होती.तसेच महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील पुरस्कारार्थी व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे