कोपरगाव आगारात समता पतसंस्थेचे जेष्ठ संचालक श्री गुलाबचंद अग्रवाल यांच्या हस्ते ‘समता पाणपोई’ चे उद्घाटन
कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे
कोपरगाव आगारात समता पतसंस्थेचे जेष्ठ संचालक श्री गुलाबचंद अग्रवाल यांच्या हस्ते ‘समता पाणपोई’ चे उद्घाटन
कोपरगाव : समता चॅरिटेबल ट्रस्ट व समता नागरी सहकारी पतसंस्था नेहमीच सामाजिक कार्यात सहभागी होऊन आम्हाला सहकार्य करीत असतात.गुढीपाडवा निमित्ताने ही कोपरगाव आगारात स्वच्छता राहावी या उद्देशाने समता पतसंस्थेच्यावतीने सहा डस्टबिन मोफत देण्यात आले तर मागील काही दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढत आहे.उन्हात पाणी हे अतिशय महत्वाचे असते त्यामुळे समता चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने प्रवाशांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था पाणपोईचे उद्घाटन करून दिली हे समताच्या खूप मोठे सामाजिक काम आहे.असे प्रतिपादन कोपरगाव आगार व्यवस्थापक श्री अभिजित चौधरी यांनी केले.
समता चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने समता पाणपोई चे उद्घाटन समता पतसंस्थेचे जेष्ठ संचालक श्री गुलाबचंद अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले.प्रसंगी समता चॅरिटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे,संचालक श्री गुलशन होडे, व्यापारी श्री दीपक अग्रवाल,समता पतसंस्थेचे जनरल मॅनेजर श्री सचिन भट्टड, कोपरगाव आगारचे माजी वाहक श्री विष्णुपंत गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.कोपरगाव आगारच्या आगार प्रमुख सौ उज्वला कुटे, वरिष्ठ लिपिक श्री औदुंबर गादी, श्री मिलिंद कोपरे,वाहतूक नियंत्रक श्री आशिष कांबळे, श्री नवनाथ बढे,श्री दिलीप आहेर,आगार लेखागार सौ सुनीता गवळी यांची ही उपस्थिती होती.
मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त करताना काका कोयटे म्हणाले की,कोपरगाव आगाराचे नूतनीकरण उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले पण कोपरगाव आगारात उन्हाळ्याच्या दिवसात तीव्र उन्हामुळे प्रवाशांसाठी पिण्याच्या पाण्याची खूप मोठी समस्या निर्माण होत असते त्यावर एक उपाय म्हणून समता ट्रस्टच्यावतीने समता पाणपोई च्या माध्यमातून प्रवाशांना स्वच्छ आणि फिल्टर युक्त पिण्याच्या पाण्याची मोफत व्यवस्था उपलब्ध करून देत आहोत.पाणपोईवर दररोज दोन कर्मचारी नियुक्त केले असून ते स्वतःकर्मचारी बसमध्ये जाऊन प्रवाशांना जागेवर जाऊन पाणी देणार आहे.यासाठी साई सृष्टीचे व्यवस्थापक श्री गणेश बोरुडे यांचे मोलाचे सहकार्य असणार आहे.
कोपरगाव आगाराच्यावतीने समता चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष काका कोयटे,उद्घाटक श्री गुलाबचंद अग्रवाल, संचालक श्री गुलशन होडे यांचा सत्कार आगार व्यवस्थापक श्री अभिजित चौधरी तर जनरल मॅनेजर श्री सचिन भट्टड यांचा सत्कार आगार कार्यशाळा अध्यक्ष श्री अमोल बनकर यांच्या हस्ते करण्यात आला.तसेच समता पतसंस्था मुख्य कार्यालयातील उपस्थित अधिकाऱ्यांचा ही सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व उपस्थितांचे आभार कोपरगाव आगार वाहतूक नियंत्रक श्री गंगाधर सानप यांनी मानले.