कोपरगावातील बाजारपेठे करीता समतातर्फे विद्युत रोषणाई
समता वार्ता कार्यकारी संपादक पोपट साळवे
कोपरगावातील बाजारपेठे करीता समतातर्फे विद्युत रोषणाई
कोपरगाव : कोपरगाव बाजारपेठेकडे ग्राहक आकर्षित होऊन दीपावलीच्या सणानिमित्ताने कोपरगाव बाजारपेठेत नवचैतन्य निर्माण व्हावे या उद्देशाने समता नागरी सहकारी पतसंस्थेमार्फत मुख्य रस्त्यावर विद्युत रोषणाई करण्यात आली तसेच शहरात खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांनी शहरातील छोटे-मोठे व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांनकडूनच दीपावलीनिमित्त आवश्यक वस्तू खरेदी करून एक सामाजिक दायित्वाची भूमिका पार पाडावी आणि स्वतःला आवश्यक असलेल्या वस्तूची खरेदी ऑनलाईन पद्धतीने न करता व्होकल फॉर लोकल या संकल्पनेच्या माध्यमातून स्थानिक बाजारपेठेमधूनच करावी.अशा आशयाचे संदेश व्हॉट्सअप,फेसबुक यांसारख्या प्रसिद्धी माध्यमाद्वारे छोटे-मोठे व्यापारी, व्यावसायिक, दुकानदार यांनी ग्राहक,सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहचवून जनजागृती करावी तसेच समता परिवाराच्या माध्यमातून देखील ग्राहकांमध्ये जनजागृती करणारे व्हिडीओ आणि संदेश प्रसिद्धी माध्यमाद्वारा पाठविण्यात येत असल्याची माहिती समता नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन आणि कोपरगाव तालुका व्यापारी महासंघाचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांनी दिली.
कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून शहर व ग्रामीण भागातील व्यावसायिकांच्या दृष्टीने आर्थिक परिस्थितीमध्ये बदल झालेले असून कोपरगाव बाजारपेठ ठप्प होत आहे.त्याचे परिणाम आज प्रत्येक छोट्या-मोठ्या व्यापाऱ्यांना सहन करावे लागत आहे.अनेक लोकांचा व्यवसाय बंद असल्याने छोटे व्यावसायिक,फळे,भाजी विक्रेते आणि हातावर पोट भरणाऱ्या नागरिकांची जगण्यासाठी धडपड सुरू असून अशा परिस्थितीत अनेक मजूर व हातावर पोट भरणारे कुटुंबांना उदरनिर्वाह करणे अवघड झाले होते.
दरम्यान समता चॅरिटेबल ट्रस्ट कोपरगाव तालुका व्यापारी महासंघ,कोपरगाव तालुका व्यापारी किराणा मर्चंट असोसिएशन,लायन्स व लिओ क्लब आणि शहरातील इतर सामाजिक संस्थांनी लॉकडाऊन काळात मोफत हँडवॉश वाटप,अनाथ व गरजू लोकांना मोफत घरपोच जेवणाचे डबे वाटप,किराणा किट वाटप आदी प्रकारचे समाजाचे काही तरी देणे लागतो यानुसार सामाजिक कामे केली होती आणि आजही करत आहे.