काका कोयटे यांच्या नेतृत्वाने समता शिखरावर – तानाजी महाडिक, अध्यक्ष
कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे


काका कोयटे यांच्या नेतृत्वाने समता शिखरावर – तानाजी महाडिक, अध्यक्ष

कोपरगाव : महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात सहकार पोहोचविण्याचे काम काका कोयटे यांनी केले. त्याच प्रमाणे ग्राहक सेवा, अत्याधुनिक तंत्रज्ञान, सभासद व ग्राहक हिताच्या विविध उपक्रमामुळे समता पतसंस्थेला देखील यशाच्या उंच शिखरावर पोहोचविलेले असून सहकारात उमटविलेला कामाचा ठसा कोपरगावातही समताच्या माध्यमातून उमटविलेला असल्याचे गौरवोद्गार मुंबई येथील मालाड पूर्व मध्ये असलेल्या ओम साई श्रद्धा नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष तानाजी महाडिक यांनी काढले.


समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयास १० डिसेंबर २०२५ रोजी मुंबईतील मालाड येथील ओम साई श्रद्धा नागरी सहकारी पतसंस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सदिच्छा भेट दिली असता मनोगत व्यक्त करताना ते बोलत होते.


ते पुढे म्हणाले की, काका कोयटे यांच्या सहकारातील कामाची झलक संस्थेत येताच पहायला मिळाली. समतातील अत्याधुनिक तंत्रज्ञान, ग्राहकाभिमुख सेवा, अधिकारी व कर्मचाऱ्यांची कार्य तत्परता, ठेवीदारांच्या ठेवींना देण्यात येणारी सुरक्षितता या योजना उपक्रमांचा अवलंब आमच्या पतसंस्थेत करणार आहोत.


या प्रतिनिधीमंडळात ओम साई श्रद्धा पतसंस्थेचे उपाध्यक्ष अर्जुन चव्हाण, संचालक रामचंद्र मोरे, पंढरी प्रभू, अशोक गवस, पांडुरंग शिंदे, नामदेव ताम्हणकर, हर्षल साळवी, सुबोध सोनगरे तसेच सौ. लविना बारस्कर, सौ. सुरेखा देशमुख आणि सौ. अवंतिका भगत (कार्यलक्षी संचालिका) यांचा समावेश होता. त्यांचा सत्कार संस्थेचे चेअरमन ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे, एच आर उज्वला बोरावके, निलेश देशमाने यांच्या हस्ते करण्यात आला.

प्रसंगी समता पतसंस्थेचे चेअरमन ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे म्हणाले की, मुंबई येथील ओम साई श्रद्धा पतसंस्थेने गत वर्षात १ कोटी ९१ लाख रुपयांची एकूण ठेवीमध्ये वाढ केली असून ही वाढ विशेष उल्लेखनीय आहे. ओम साई श्रद्धा पतसंस्थेचे अध्यक्ष उपाध्यक्ष व संचालक मंडळावर सभासद व ग्राहकांनी ठेवलेला विश्वास यामुळे नक्कीच कौतुकास्पद आहे.


मुख्य कार्यालयाचे अधिकारी निलेश देशमाने यांनी शब्दात वापरत असलेल्या अत्याधुनिक तंत्रज्ञान, समता वसुली पॅटर्न, मोबाईल बँकिंग, पेपरलेस सुविधा विषयी तर सोने तारण वितरित करण्याच्या प्रक्रियेविषयी सोनेतारण अधिकारी राहुल मालकर यांनी सविस्तर माहिती दिली. समता महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांसाठी रोजगार उपलब्ध करण्यात आलेल्या सहकार उद्योग मंदिराविषयीची माहिती विजय गोयल यांनी दिली.



