समताच्या सहकार्यामुळे माझ्या जीवनाचा प्रवास सुखकर – श्री अरविंद पटेल,जेष्ठ संचालक
कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे
समताच्या सहकार्यामुळे आज माझ्या जीवनाचा प्रवास सुखकर – श्री अरविंद पटेल,जेष्ठ संचालक
समताचे जेष्ठ संचालक श्री अरविंद पटेल यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
कोपरगाव : कोपरगाव शहरात ४० वर्षापूर्वी आलो असता शहरातील प्रसिध्द व्यापारी काका कोयटे आणि जीतुभाई शहा यांच्याशी माझा परिचय झाला आणि त्यानंतर मी समता परिवाराशी जोडला गेलो.कोयटे परिवार आणि समता परिवाराशी आज माझे जिव्हाळ्याचे नाते असून यांच्या सहकार्यामुळे माझ्या जीवनाचा प्रवास सुखकर होत आहे.असे भावनिक गौरोद्गार समता नागरी सहकारी पतसंस्थेचे जेष्ठ संचालक श्री अरविंद पटेल यांनी काढले.
समता नागरी सहकारी पतसंस्थेत संस्थेचे जेष्ठ संचालक श्री अरविंद पटेल यांचा ६८ वा वाढदिवस २३ मे २०२२ रोजी संस्थेचे चेअरमन ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे,जेष्ठ संचालक जितूभाई शहा,श्री चांगदेव शिरोडे,श्री गुलशन होडे, वैजापूर येथील प्रसिध्द व्यापारी श्री कैलास साखरे आदींच्या उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला.
प्रसंगी संस्थेचे चेअरमन काका कोयटे बोलताना म्हणाले की, पटेल कुटुंब जेव्हा कोपरगाव शहरात आले तेव्हा त्यांनी छोटे पटेल ऑप्टिकल या नावाने दुकान सुरु केले आणि आज त्यांनी कोपरगाव शहरात व्यापारी म्हणून मोठा नावलौकिक मिळविला असून त्यांची मुले देखील परदेशात स्थायिक आहेत तरी देखील ते समता परिवाराला वेळ देत असतात तसेच त्यांच्या शांत व मनमिळाऊ स्वभावामुळे एक आदर्श व्यक्तिमत्व समताला मिळालेले आहे.
वाढदिवसानिमित्त श्री अरविंद पटेल यांचा सत्कार संस्थेचे चेअरमन काका कोयटे यांच्या हस्ते करण्यात आला तर उपस्थित संचालकांनी त्यांना पेढा भरवत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तसेच कोपरगाव शाखेच्या कर्मचारी सौ सुषमा देशमुख यांचाही वाढदिवस असल्यामुळे त्यांचाही सत्कार संस्थेचे चेअरमन काका कोयटे यांच्या हस्ते करून त्यांनाही शुभेच्छा देण्यात आल्या.ठेव विभाग प्रमुख श्री संजय पारखे यांनी मनोगत व्यक्त केले.मुख्य कार्यालय आणि कोपरगाव शाखेतील अधिकारी,कर्मचारी यांनी ही त्यांना शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आणि उपस्थितांचे आभार मुख्य कार्यालयाच्या एच.आर.श्रीमती उज्वला बोरावके यांनी मानले.