महात्मा बसवेश्वरांच्या स्मारकाविषयी केलेल्या घोषणेची अंमलबजावनी त्वरित करावी – श्री संतोष जिरेसाळ,जिल्हाध्यक्ष
कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे
महात्मा बसवेश्वरांच्या स्मारकाविषयी केलेली घोषणा शासनाने पूर्ण करावी – श्री संतोष जिरेसाळ,जिल्हाध्यक्ष
महाराष्ट्र राज्य लिंगायत संघर्ष समिती अहमदनगर जिल्हाध्यक्ष पदी संतोष जिरेसाळ यांच्या निवडीबद्दल सत्कार करताना उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष चंद्रशेखर दंदणे,समवेत डावीकडून जेष्ठ नेते गोपीनाथ निळकंठ,चांदवड मर्चंट को-ऑप.बँकेचे संचालक सुनिल तात्या कबाडे,मुख्य समन्वयक काका कोयटे,महाराष्ट्र राज्य समन्वयक अनिल चौगुले,नाशिक जिल्हाध्यक्ष संदीप झरेकर,मनमाड लिंगायत समाज अध्यक्ष गणेश देशमुख
शासनाने जाहीर केलेल्या १०० कोटी रुपयांच्या निधीमध्ये महात्मा बसवेश्वरांचे स्मारक उभारावे – काका कोयटे,मुख्य समन्वयक
कोपरगाव – महाराष्ट्रातील वीरशैव समाजाचे जगदज्योती महात्मा बसवेश्वर हे आराध्य दैवत आहे. महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा हि महात्मा बसवेश्वरांची कर्मभूमी आहे.मंगळवेढा येथे महाराष्ट्र शासनाने महात्मा बसवेश्वरांचे स्मारक उभारण्यासाठी ५२ एकर जागा देऊन १०० कोटी रुपयांचा निधी २०१६ साली देण्याची घोषणा केली होती. या घोषणेची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही.त्यामुळे आता महाराष्ट्रातील वीरशैव लिंगायत समाज बांधव मंगळवेढा येथे स्वखर्चाने महात्मा बसवेश्वरांचे स्मारक उभारणार असल्याची माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पाथर्डी येथील जिल्हाध्यक्ष व अहमदनगर जिल्हा लिंगायत संघर्ष समितीचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष श्री संतोष जिरेसाळ यांनी दिली.
कोपरगाव तालुक्यातील समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या स्व.यशवंतराव चव्हाण सहकार सभागृहात महाराष्ट्र राज्य लिंगायत संघर्ष समितीच्या अहमदनगर जिल्हा पदग्रहण समारंभाप्रसंगी ते बोलत होते.
प्रसंगी बोलतांना महाराष्ट्र राज्य लिंगायत समितीचे मुख्य समन्वयक ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे म्हणाले कि,गेली अनेक वर्ष मंगळवेढा येथे महात्मा बसवेश्वर यांचे स्मारक उभारण्यात यावे अशी महाराष्ट्रातील सर्वच वीरशैव बांधवांची इच्छा आहे.परंतु शासन या मागणीकडे दुर्लक्ष करीत आहे. आतापर्यंत शासनाने या मागणीच्या अनुषंगाने दोन समित्या नेमल्या, कालांतराने नेमलेल्या दोन्हीही समित्या बरखास्त करण्यात आल्या, आता कोणतीही समिती न नेमता यापूर्वी शासनाने जाहीर केलेल्या १०० कोटी रुपयांच्या निधीमध्ये स्मारक उभारावे अन्यथा महाराष्ट्राच्या विविध भागातून वीरशैव लिंगायत समाज बांधव २१ ऑगस्ट २०२२ रोजी पदयात्रा नेऊन मंगळवेढा येथील महात्मा बसवेश्वरांचे स्मारक उभारतील.
कार्यक्रमाचे प्रास्तविक कोपरगाव तालुका लिंगायत संघर्ष समितीचे श्री.गोपीनाथ निळकंठ यांनी केले.तर सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, क्रीडा, वैद्यकीय यांसारख्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या वीरशैव समाज बांधवांचा सत्कार महाराष्ट्र लिंगायत संघर्ष समितीचे मुख्य समन्वयक काका कोयटे यांच्या हस्ते करण्यात आला. त्यात चांदवड येथील चांदवड मर्चंट को-ऑप.बँकेवर नवनिर्वाचित संचालक म्हणून निवड झालेले श्री.सुनील तात्या कबाडे, नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनवर सहसचिव म्हणुन निवड झालेले श्री.चंद्रशेखर दंदणे,लिंगायत संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य समन्वयक पदी निवड झालेले श्री.अनिल चौगुले, मनमाड लिंगायत समाजाच्या अध्यक्ष पदी निवड झालेले श्री.गणेश देशमुख, कोरोना काळात उल्लेखनीय कार्य करून मानवतेची सेवा केल्याबद्दल डॉ.योगेश झाडबुके धुळे, कोपरगाव तालुक्यातील कुंभारी येथील श्री राघवेश्वर ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेच्या अध्यक्ष पदी निवड झालेले श्री. गोपीनाथआप्पा निळकंठ यांचा गौरव करून सन्मान करण्यात आला.
प्रसंगी श्री.चंद्रशेखर दंदणे मनोगत व्यक्त करताना म्हणाले कि,महाराष्ट्र शासनाने मंगळवेढा येथे महात्मा बसवेश्वरांचे भव्य स्मारक उभारणीसाठी नाशिक जिल्हयातून हजारो वीरशैव बांधव मोठ्या संख्येने मंगळवेढा या ठिकाणी उपस्थित राहतील. तर श्री. अनिल चौगुले म्हणाले कि, मंगळवेढा येथे उभारण्यात येणाऱ्या स्मारकासाठी महाराष्ट्रातून लाखोंच्या संख्येने वीरशैव समाज बांधव त्या ठिकाणी उपस्थित राहतील.ज्या प्रमाणे लिंगायत समाजाच्या विविध प्रश्नांसाठी आंदोलन करण्यात आले होते, त्याप्रमाणे महात्मा बसवेश्वर यांच्या स्मारकासाठी आझाद मैदानावर आंदोलन करण्यात येईल.
यावेळी कोपरगाव नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा सौ.सुहासिनिताई कोयटे, युवा अध्यक्ष प्रदीप साखरे, नाशिक जिल्हाध्यक्ष संदीप झरेकर, अहमदनगर जिल्हाध्यक्ष संतोष जिरेसाळ,धुळे जिल्हाध्यक्ष नितीन लिंगायत,जेष्ठ नेते प्रकाश अप्पा साबरे, कार्याध्यक्ष जयंत लोहारकर,उपाध्यक्ष पदमाकर साखरे,सेक्रेटरी सुधीर भुसारे,जेष्ठ नेते गोपीनाथ निळकंठ, रत्नाकर साखरे व नवनिर्वाचित लिंगायत संघर्ष समिती अहमदनगर जिल्हा,संगमनेर,पाथर्डी,नेवासा, शिर्डी,कोपरगाव चे पदाधिकारी व समाजबांधव व भगिनी उपस्थित होते.पदग्रहण समारंभाचे सुत्रसंचालन आणि उपस्थितांचे आभार लिंगायत संघर्ष समितीचे श्री.प्रदीप साखरे यांनी मानले.