ब्रेकिंग

फलटण तालुक्यातील पतसंस्थेच्या पदाधिकाऱ्यांची समताच्या मुख्य कार्यालयास सदिच्छा भेट

कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे

फलटण तालुक्यातील पतसंस्थेच्या पदाधिकाऱ्यांची समताच्या मुख्य कार्यालयास सदिच्छा भेट

फलटण तालुक्यातील विजय ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे संस्थापक सुभाषराव धुमाळ यांचा सत्कार करताना. समवेत उपस्थित पदाधिकारी.

कोपरगाव : येथील समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयास सातारा जिल्ह्यातील फलटण तालुका,आदर्की बु.येथील विजय ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे चेअरमन विश्वासराव धुमाळ, व्हा.चेअरमन राजेंद्र पवार, संचालक चाद पठाण, पंढरीनाथ धुमाळ, कृष्णात अनपट, तानाजी धुमाळ, शिवाजी शिंदे, गणेश धुमाळ, राकेश मांढरे, निवास काकडे, बाबा खराडे, विजयकुमार धुमाळ, भानुदास जाधव आदि पदाधिकाऱ्यांनी २३ ऑगस्ट २०२३ रोजी सदिच्छा भेट दिली.

समता पतसंस्थेची फॉरेन्सिक ऑडिट कंट्रोल रूम

समता पतसंस्थेची व्हाऊचरलेस बँकिंग प्रणाली

या वेळी विजय ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे चेअरमन विश्वासराव धुमाळ व उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांचा ठेव विभागाचे संजय पारखे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.सत्काराला उत्तर देताना विश्वासराव धुमाळ म्हणाले की, समता पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयाची सुसज्ज इमारत व आतील अंतरंग हे प्रशंसनीय असून फॉरेन्सिक ऑडिट कंट्रोल रूम,सोनेतारण प्रक्रिया, समता रिकव्हरी पॅटर्न, कर्मचाऱ्यांचा नीटनेटका गणवेश विशेष उल्लेखनीय असून प्रत्येक संस्थेला गरजेचा आहे.आम्हीही आमच्या पतसंस्थेत या संकल्पना राबविणार आहोत. समताचे कामकाज, तंत्रज्ञान प्रणालीमुळे आम्हालाही प्रेरणा मिळाली असून पतसंस्था चळवळीत तंत्रज्ञानयुक्त पतसंस्था म्हणून आमची ओळख निर्माण करू.

समता पतसंस्थेच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मोबाईल बँकिंग, व्हाऊचरलेस बँकिंग सुविधा, क्यु.आर.कोड, फॉरेन्सिक ऑडीट कंट्रोल रूम, समता रिकव्हरी पॅटर्न, सोनेतारण विभागातील सुविधा या पतसंस्था चळवळीला दिशादर्शक असणाऱ्या अत्याधुनिक बँकिंग प्रणालीविषयी ठेव विभागाचे श्री.संजय पारखे यांनी सविस्तर माहिती दिली.

<

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे