समता पतसंस्थेच्या कर्ज थकबाकी पोटी दिलेला चेक न वटल्याने आरोपी शेख यास कारावास व दंड
कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे
समता पतसंस्थेच्या कर्ज थकबाकी पोटी दिलेला चेक न वटल्याने आरोपी शेख यास कारावास व दंड
कोपरगाव : समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या अहमदनगर शाखेचे थकित कर्जदार अब्दुल दौलत शेख यांनी संस्थेच्या अहमदनगर शाखेत कर्जाच्या थकबाकीपोटी दिलेला चेक न वटल्याने त्यांच्या विरुद्ध निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट कलम १३८ अन्वये चिफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट अहमदनगर यांच्या कोर्टात अहमदनगर शाखेचे शाखाधिकारी एन.जी.गुंजाळ यांनी फिर्याद दाखल केली होती. त्यांना समता पतसंस्थेचे वसुली विभागातील कायदेशीर सल्लगार एस.जी.पठारे यांनी सहकार्य आणि कायदेशीर मार्गदर्शन केले. मे कोर्टाने आरोपीस दोषी धरून १ महिना कारावास व ४५,०००/- हजार रुपये दंड दोन महिन्यांच्या आत समता पतसंस्थेच्या अहमदनगर शाखेत फिर्यादी गुंजाळ यांच्याकडे देण्याचा आदेश पारित केला आहे. तसेच दंडाची रक्कम दोन महिन्यात ‘न’ दिल्यास सात दिवसांचा पुन्हा कारावास असा आदेश कोर्टाने पारित केलेला आहे.समता पतसंस्थेतर्फे ॲड.वृषाली तांदळे यांनी काम पाहिले.
महाराष्ट्र सहकारी संस्था कलम १०१ व १५६ अन्वये तसेच फौजदारी कायद्याप्रमाणे व निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट कलम १३८ अन्वये थकबाकी वसुली करणे कामी कठोर व कायदेशीर कारवाई थकबाकीदार, कर्जदार व त्यांचे जामिनदार यांचे विरूद्ध केली जाते. समता पतसंस्थेची वसुली कठोर आणि कायदेशीर आहे. तसेच कोर्टाच्या या निकालामुळे थकबाकीदार, कर्जदारांमध्ये भितीचे वातावरण निर्माण होऊन थकित कर्जदार त्याच्याकडील थकबाकी भरणेकामी हालचाली करत आहेत. असे विशेष वसुली व विक्री अधिकारी जनार्दन कदम यांनी सांगितले.