समता इंटरनॅशनल स्कूलमध्ये ७३ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न
समता वार्ता कार्यकारी संपादक प्रा पोपट साळवे
समता इंटरनॅशनल स्कूलमध्ये ७३ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न
कोपरगाव : समता इंटरनॅशनल स्कूल ही अहमदनगर जिल्ह्यातीलच नव्हे,तर महाराष्ट्रातील आंतरराष्ट्रीय पातळीवरील शिक्षण देणारी उत्कृष्ट संस्था असून या संस्थेतील शिक्षक शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये संस्थापक काका कोयटे यांचे आचार,विचार,संस्कार शिकवत असतात त्यामुळे समतातील विद्यार्थी शैक्षणिक दृष्ट्या सर्व गुण संपन्न बनतात तसेच समताचे गुण आणि मूल्य आत्मसात करून सातासमुद्रापार समताचा झेंडा फडकवतील.असे गौरवोद्गार कोपरगाव तालुका एक्स सर्व्हिसमेन्स असोसिएशनचे अध्यक्ष श्री युवराज गांगवे यांनी काढले.
समता इंटरनॅशनल स्कूलमध्ये ७३व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त कोपरगाव तालुका एक्स सर्व्हिसमेन्स असोसिएशनचे अध्यक्ष श्री युवराज गांगवे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
ध्वजारोहण कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते तर कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान समता स्कूलचे संस्थापक ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांनी भूषविले.एक्स सर्व्हिस मेन्स असोसिएशनचे माजी सैनिक, कोपरगाव नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा व समता महिला बचत गटाच्या अध्यक्षा सौ सुहासिनी कोयटे,समता पतसंस्थेच्या व्हा.चेअरमन सौ.श्वेता अजमेरे,जेष्ठ संचालक श्री अरविंद पटेल,श्री गुलशन होडे,समता स्कूलच्या मॅनेजिंग ट्रस्टी सौ स्वाती कोयटे,मुख्य कार्यवाह श्री संदीप कोयटे यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रमुख पाहुणे श्री युवराज गांगवे यांचा सन्मान समता स्कूलचे संस्थापक काका कोयटे यांनी केला तर संघटनेच्या इतर माजी सैनिकांचा सन्मान समता पतसंस्थेचे जेष्ठ संचालक श्री अरविंद पटेल,श्री गुलशन होडे यांच्या हस्ते समता महिला बचत गटाने उत्पादित केलेल्या उत्पादनांचा एकत्र बांधून तयार केलेला गुच्छ देऊन करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शैक्षणिक संचालिका सौ लिसा बर्धन यांनी केले प्रमुख पाहुणे आणि प्रमुख उपस्थितांचे स्वागत उपप्राचार्य श्री समीर अत्तार यांनी केले.
त्यानंतर समता टायनी टॉट्स मधील शौर्य शर्मा,रैना अगरवाल,स्वराली गोपाळ,पहेल जैन यांनी प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व भाषणातून व्यक्त केले.उत्कृष्ट विचार व्यक्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांचे हस्ते पारितोषिके देण्यात आली. इ.९ वी, इ.१० वी तील विद्यार्थ्यानी तबला,गिटार,पियानोच्या तालावर तु मेरा कर्मा, तु मेरा धर्मा हे गीत सादर केले.यात प्रामुख्याने कुलदीप कोयटे,सिद्धांत जोशी,कामरान अत्तार, निहार गीते,सुजल संचेती,राजहंस आढाव यांचा समावेश होता.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन इ.११वी ची विद्यार्थिनी सुचिता पवार व इ.१२ वी तील विद्यार्थी शंतनू होन यांनी केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी समता स्कूलचे शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.उपस्थितांचे आभार उपप्राचार्य श्री समीर अत्तार यांनी मानले.