सोनेतारण हा समताचा एक नवीन प्रयोग होता – श्री संदीप कोयटे
समता वार्ता कार्यकारी संपादक प्रा पोपट साळवे
सोनेतारण हा समताचा एक नवीन प्रयोग होता – श्री संदीप कोयटे
कोपरगाव : समता नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन काका कोयटे आणि संचालक मंडळाच्या मार्गदर्शनाखाली आम्ही समताच्या सभासद, ग्राहकांसाठी नेहमीच नवनवीन योजना, उपक्रमाबरोबरच समताच्या सुरक्षिततेसाठी नवीन वेगवेगळे प्रयोग करत असतो त्यातीलच सुरक्षित सोनेतारण कर्ज हा एक नवीन प्रयोगच होता यात समताने दिड वर्षात १५० कोटी रुपयांचा टप्पा पार केला असून समताच्या प्रगती आणि सुरक्षेच्या दृष्टीने अजूनही वेगवेगळे प्रयोग करणार आहे.असे प्रतिपादन समता नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक श्री संदीप कोयटे यांनी केले.
समता पतसंस्थेच्या स्व. मोहनलाल आनंदराम झंवर सभागृहात संचालक श्री संदीप कोयटे यांचा ४१ वा वाढदिवस समताचे चेअरमन ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे, माजी संचालक श्री अशोक दरक,जेष्ठ संचालक सर्वश्री रामचंद्र बागरेचा, चांगदेव शिरोडे,अरविंदजी पटेल,जितुभाई शहा,कचरू मोकळ, गुलशन होडे, किरण शिरोडे,दिपक अग्रवाल, व्यापारी श्री सचिन ठोळे यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहवर्धक वातावरणात संपन्न झाला.त्या प्रसंगी ते बोलत होते.
प्रसंगी संचालक श्री संदीप कोयटे यांचा सत्कार जेष्ठ संचालक श्री रामचंद्र बागरेचा, श्री अरविंद पटेल, श्री चांगदेव शिरोडे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला त्यानंतर त्यांच्या हस्ते केक कापून उपस्थित संचालक श्री गुलशन होडे,श्री किरण शिरोडे,श्री दिपक अग्रवाल,जनरल मॅनेजर श्री सचिन भट्टड यांनी केक भरविला.
तर जेष्ठ संचालक श्री अरविंद पटेल मनोगत व्यक्त करताना म्हणाले की,समताच्या प्रगतीसाठी नेहमीच सहकाराचा अभ्यास करत असून सहकारातील ज्ञानाचा उपयोग होत असतो. या पुढेही त्यांनी समताच्या प्रगतीसाठी सदैव प्रयत्नशील राहावे. आमचा नेहमीच त्यांना पाठिंबा असतो.
तसेच असिस्टंट जनरल मॅनेजर(वसुली विभाग) श्री जनार्दन कदम,कोपरगाव शाखेचे शाखाधिकारी श्री आप्पासाहेब कोल्हे,श्री महेश भावसार आदींनी मनोगतातून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या तर उपस्थित अधिकारी, कर्मचारी यांनीही शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन फॉरेन्सिक ऑडीट कंट्रोल रूम प्रमुख श्री संजय पारखे यांनी केले तर उपस्थितांचे आभार एच.आर श्रीमती उज्वला बोरावके यांनी मानले.