समता सहकार उद्योग मंदिराच्या माध्यमातून महिला उद्योजकांना बाजारपेठ उपलब्ध करून दिली – सौ विमल पुंडे ; तालुक्यातील महिला उद्योजकांची सहकार उद्योग मंदिरास सदिच्छा भेट
समता वार्ता कार्यकारी संपादक पोपट साळवे
समता सहकार उद्योग मंदिराच्या माध्यमातून महिला उद्योजकांना बाजारपेठ उपलब्ध करून दिली – सौ विमल पुंडे ; तालुक्यातील महिला उद्योजकांची सहकार उद्योग मंदिरास सदिच्छा भेट
कोपरगाव : महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन आणि सहकार उद्यमी संचलित समता महिला बचत गट अंतर्गत सहकार उद्योग मंदिरामुळे महाराष्ट्रातील महिलांना आर्थिक स्थिरता प्राप्त करून दिली तसेच त्यांनी बचत गटांतर्गत किंवा स्वतः घरगुती पद्धतीने बनविलेल्या महिला उद्योजकांच्या मालाला बाजारपेठ उपलब्ध करून देत समता महिला बचत गटाने एक सुवर्ण संधी उपलब्ध करून दिली आहे.असे प्रतिपादन योग शिक्षिका सौ विमल पुंडे यांनी केले.
समता महिला बचत गटाच्या सहकार उद्योग मंदिरास योग प्रचार प्रसार संस्थेच्या योग शिक्षिका सौ विमल पुंडे आणि योग शिक्षक श्री दत्तात्रय पुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ८ डिसेंबर २०२१ रोजी तालुक्यातील महिला उद्योजकांनी सदिच्छा भेट दिली.त्या प्रसंगी त्या बोलत होत्या.
तसेच त्या पुढे म्हणाल्या की, कोयटे परिवार सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असून गरज पडेल त्या वेळेला कोयटे परिवार सर्वसामान्य नागरिकांच्या पाठीशी नाही तर बरोबर उभा राहून सामाजिक दायित्वाची भूमिका पार पाडत असतो.कोरोना काळात देखील बचत गटातील महिलांना रोजगार उपलब्ध करून देत महिलांची आर्थिक घडी विस्कटू न देता ती भक्कम केली.
प्रसंगी समता महिला बचत गटाचे मार्गदर्शक ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे उपस्थित महिला उद्योजकांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, कुटुंबाची आर्थिक घडी बसविण्याची महत्त्वपूर्ण भूमिका त्या कुटुंबातील महिला पार पाडत असतात, त्याच कुटुंबातील महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला तर त्या कुटुंबाला एक प्रकारचे आर्थिक स्थैर्य प्राप्त होईल व त्या कुटुंबातील सर्वच जुजबी समस्या सुटतील या विचाराने समता महिला बचत गटाच्या माध्यमातून सहकार उद्योग मंदिराचा शुभारंभ करून महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे तसेच बचत गटातील महिलांनी उत्पादित केलेल्या मालाला आंतरराष्ट्रीय स्तरावरील ऑनलाईन बाजरपेठ उपलब्ध करून त्यांच्या मालाला योग्य तो मोबदला मिळणार आहे.
तसेच समता महिला बचत गटाच्या अध्यक्षा सौ सुहासिनी कोयटे यांनी योग शिक्षिका सौ विमल पुंडे व श्री दत्तात्रेय पुंडे याचे स्वागत करून समता महिला बचत गटाच्या महिलांनी कलाकुसर करून अगरबत्ती व कापूर एकत्र बांधून तयार केलेला गुच्छ देऊन सत्कार केला तर उपस्थित महिला उद्योजकांचा समता महिला बचत गटाच्या महिलांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी योगशिक्षक दत्ता पुंडे, सुमित्रा कुलकर्णी, वंदना चिकटे, उषाताई शिंदे, पल्लवी भगत, यांनी मनोगत व्यक्त त्या करत असलेल्या उद्योगाची ओळख करून दिली.अगरबत्ती व कापूर उत्पादन विभागाचे श्री अजय तांबे यांनी मनोगत व्यक्त करून उपस्थित महिला उद्योजकांची भावनिक दृष्ट्या वाहवा मिळविली. तर सुनिता भुतडा, गिरीषा कदम, सोनाली जाधव, जयश्री गुजराती, सारीका भावसार, विद्या गोखले, सुनिता धनवटे, वालझडे ताई, ऊर्मिला लोळगे,अनिता दातीर, सुजाता कोपरे, अर्चना लाड, भावना गवांदे, मीना भालेराव, स्मिता कुलकर्णी, हेमलता आमले,वैशाली दिवेकर, आरती चकाले, सुप्रिया निळेकर, स्वाती अमृतकर आदी महिला उद्योजक उपस्थित होत्या.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अगरबत्ती व कापूर उत्पादन विभागाचे श्री विश्वास सावरगावकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार श्री प्रदीप वैद्य यांनी मानले.