समता पतसंस्थेच्या शाखांत श्री गणेशजीची प्रतिष्ठापणा
समता वार्ता कार्यकारी संपादक पोपट साळवे
समता पतसंस्थेच्या शाखांत श्री गणेशजीची प्रतिष्ठापणा
कोपरगाव – समता नागरी सहकारी पतसंस्था विविध क्षेत्रातील सभासदांसाठी योजना,सामाजिक उपक्रम नेहमीच राबवत असते तसेच धार्मिक दृष्टिकोणातूनही ग्राहक,सभासदांपर्यंत पोहचत असते.त्याच अनुषंगाने सालाबादाप्रमाणे या ही वर्षी गणेश चतुर्थी निमित्त विधीवत पूजा करून मोठ्या थाटामाटात संस्थेच्या प्रत्येक शाखेत श्री गणेशाची प्रतिष्ठापणा करण्यात आली.




कोपरगाव शाखेतील सभासद सौ अक्षदा व श्री अनुप अरविंद पटेल हे शहरातील प्रसिध्द व्यवसायिक आहे. श्री दिगंबर जगताप हे शिर्डी शाखेतील सभासद असून जय मल्हार हॉटेलचे मालक आहे.सी न्यूज़ चे प्रतिनिधी श्री शरद पाचर्णे हे राहुरी शाखेचे सभासद आहे.श्री व सौ सतीश मोरगे हे श्रीरामपूर शाखेतील ठेवीदार आहे.नाशिक शाखेतही श्री गणेशाचे आगमन झाले प्रसंगी फूड बास्केट दुकानाचे मालकश्री राजेश बोथरा आदीं सभासदांच्या हस्ते श्री गणेशाची पूजा करून स्थापना करण्यात आली. प्रसंगी समता नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयट,संचालक श्री अरविंद पटेल,श्री चांगदेव शिरोडे,श्री जितुभाई शहा,श्री संदीप कोयटे,गुलशन होडे, जनरल मॅनेजर सचिन भट्टड, मुख्य कार्यालयातील पदाधिकारी, अधिकारी, शाखाधिकारी, कर्मचारी,हितचिंतक उपस्थित होते.
