समताचे आधुनिक तंत्रज्ञान कौतुकास्पद – जयकुमार शिंदे
समता वार्ता कार्यकारी संपादक पोपट साळवे
समताचे आधुनिक तंत्रज्ञान कौतुकास्पद – जयकुमार शिंदे
कोपरगाव– समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयास फलटण येथील प्रारंभ म्युच्युअल निधी चे अध्यक्ष श्री.जयकुमार शिंदे, संचालक रणसिंग गाडे, जनरल मॅनेजर रुपेश देवरे, लिपिक राजू शिंदे, विश्वराज कुदळे आदींनी १६ सप्टेंबर रोजी सदिच्छा भेट दिली.
प्रसंगी समता पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयातील ई.डी.पी. विभाग प्रमुख योगेश आसने, कोपरगाव शाखेचे शाखाधिकारी आप्पासाहेब कोल्हे यांनी सत्कार केला. तत्पूर्वी समतातील फॉरेन्सिक ऑडीट कंट्रोल रूम, मुख्य कार्यालयातील विविध विभाग, व्हाऊचरलेस बँकिंग,क्यु.आर.कोड, सोनेतारण विभाग,ऑनलाईन समता रिकव्हरी पॅटर्न विषयी सविस्तर माहिती एच.आर.श्रीमती उज्वला बोरावके,लोन विभागाचे निलेश देशमाने यांनी तर कोपरगाव शाखेचे आप्पासाहेब कोल्हे यांनी पेपरलेस बँकिंग, व्हाऊचरलेस बँकिंग, मोबाईल बँकिंग तसेच शाखेतील कामकाजाविषयी माहिती दिली.
प्रारंभ म्युच्युअल निधी चे अध्यक्ष श्री.जयकुमार शिंदे मनोगत व्यक्त करताना म्हणाले कि, ‘काकांच्या मार्गदर्शनाखाली समता पतसंस्था हे एक मोठे वटवृक्ष तयार झाले असून या वृक्षाच्या मुळ्या शहरातच नाही तर सर्वस, ग्रामीण भागात जाऊन पोहचल्या आहे. सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक सहाय्य करून त्याला आर्थिक स्थिरता प्राप्त करून देणे तसेच छोटे व्यापारी, व्यावसायिक यांना देखील आर्थिक स्वरुपात स्थिरता निर्माण करून देत असल्याचे भेट दिल्यानंतर लक्षात आले. समतातील कर्मचारी आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ग्राहक सभासदांना तत्पर सेवा पुरवित असल्यामुळे समताचे आधुनिक तंत्रज्ञान कौतुकास्पद आहे. आमच्या प्रारंभ म्युच्युअल निधी मध्ये समता वापरत असलेल्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आर्थिक प्रगती साधणार आहोत. आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करावेत’.
समता पतसंस्थेच्या भेटीप्रसंगी समताचे पदाधिकारी, अधिकारी आदींनी दिलेली अनमोल माहिती व बहुमोल वेळ दिल्याबद्दल प्रारंभ म्युच्युअल निधीचे संचालक रणसिंग गाडे यांनी आभार व्यक्त करत समताच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.