गणेशजींच्या आरतीप्रसंगी सभासदांचा सन्मान – काका कोयटे
समता वार्ता कार्यकारी संपादक पोपट साळवे
गणेशजींच्या आरतीप्रसंगी सभासदांचा सन्मान – काका कोयटे
कोपरगाव : गणेश चतुर्थीपासून श्रींच्या आरतीसाठी संस्थेच्या सभासदांना बोलावून त्यांच्या हस्ते विधीवत पूजा व आरती करण्याचा मान संस्थेच्यावतीने देत आहोत तसेच आरतीसाठी आलेले सभासद,ठेवीदार,कर्जदार आदींचा सन्मान करणे देखील आमचे कर्तव्य आहे ते कर्तव्य आम्ही त्यांचा यथोचित सन्मान करून पूर्ण करत असल्याची माहिती समता नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांनी दिली.
समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयात १४ सप्टेंबरच्या श्रींच्या आरतीप्रसंगी ते बोलत होते.आरतीला संस्थेचे जेष्ठ संचालक श्री जितुभाई शहा, जनरल मॅनेजर श्री सचिन भट्टड यांची उपस्थित होती तसेच मुख्य कार्यालयातील पदाधिकारी,अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते.
कोपरगाव शाखेत खातेदार सौ उत्कर्षा व श्री स्वरूप बाबासाहेब कापे यांच्या हस्ते गणेशजींची आरती करण्यात आली.प्रसंगी संस्थेचे चेअरमन ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांच्या हस्ते समता महिला बचत गट अंतर्गत अगरबत्ती विभागाद्वारा बनविण्यात आलेल्या अगरबत्ती व कापूरचा एकत्र केलेला गुच्छ देण्यात आला.तसेच आज येवला शाखेत सायंकाळ ची आरती सौ व श्री तक्ते यांच्या हस्ते करण्यात आली. नाशिक शाखेत सकाळची आरती राजेंद्र खैरे व सायंकाळची आरती सभासद श्री अंबादास साखरे यांच्या हस्ते करण्यात आली.श्री कोंडाजी सोनवणे यांनी सकाळी तर श्री अनिकेत तुपे यांनी संध्याकाळी राहता शाखेतील गणेशजींची आरती केली.
राहुरी शाखेत ठेवीदार श्री सुरेंद्र शेटे यांच्या हस्ते आरती केली. शिर्डी शाखेत ठेवीदार श्री भाऊराव देशमुख यांच्या हस्ते आरती करण्यात आली.अहमदनगर शाखेत श्री विष्णुदास मर्दा यांच्या हस्ते आरती करण्यात आली.
जामखेड शाखेत गोल्ड व्हॅल्युअर श्री श्रीकांत कुलथे यांना आरती करण्याचा मान दिला. श्री मोतीभाऊ चुडीवाल यांच्या हस्ते श्रीरामपूर शाखेत आरती करण्यात आली. येवला शाखेत सभासद श्री किरण थोट यांच्या हस्ते करण्यात आली. श्री सुदर्शन जोर यांच्या हस्ते सकाळी तर श्री नामदेव दाणे यांच्या हस्ते वैजापूर शाखेत सायंकाळची आरती केली.नांदेड शाखेतही सकाळी श्री प्रमोद भारसवाडकर व संध्याकाळी सौ नीलम निलेश ठक्कर यांच्या हस्ते आरती करण्यात आली.
