लायन्स क्लब ऑफ कोपरगावच्या वतीने काका कोयटे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर
समता वार्ता कार्यकारी संपादक पोपट साळवे
लायन्स क्लब ऑफ कोपरगावच्या वतीने काका कोयटे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर
कोपरगाव– रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून त्यामुळे रक्त दात्याने केलेले रक्तदान हे गरजवंतासाठी अमृतासारखे असते. या सामाजिक दायित्वामुळे ‘रक्तदान करूया, एखाद्याला नवीन आयुष्य देऊ या’ या सामाजिक उपक्रमांतर्गत रक्तदान शिबिराचे आयोजन करून कोविड काळात निर्माण झालेली रक्ताची कमतरता भरून काढण्याचा एक सामाजिक प्रयत्न रक्तदान शिबिराच्या अनुषंगाने आम्ही केला. प्रत्येक वर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन करून रक्तदाते एक सामाजिक दायित्वाची भूमिका पार पडत असतात.
तसेच मागीलवर्षी देखील समताचे मार्गदर्शक काका कोयटे वाढदिवसानिमित्त कोरोना काळातही रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे विविध संघटना मिळून रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. वाढदिवसानिमित्त प्रत्येक वर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते. त्याचप्रमाणे याही वर्षी रक्तदात्यांनी समता आणि इतर सामाजिक संस्थांनी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. प्रत्येक वर्षी रक्तदान करणाऱ्यांची संख्या वाढत असून याही वर्षी १०४ रक्तदात्यांनी रक्तदान केले. असे प्रतिपादन लायन्स क्लब ऑफ कोपरगावचे अध्यक्ष श्री रामदास थोरे यांनी केले.
समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या स्व.यशवंतराव चव्हाण समता सहकार सभागृहात समता चॅरिटेबल ट्रस्ट, लायन्स क्लब ऑफ कोपरगाव, लिओ क्लब ऑफ कोपरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन करण्यात आलेल्या भव्य रक्तदान शिबिराचे उद्घाटन शिर्डी येथील श्री साईनाथ हॉस्पिटलच्या रक्त संक्रमण अधिकारी डॉ.सुप्रिया सुंभ, समता नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक श्री संदीप कोयटे व लायन्स क्लबचे अध्यक्ष श्री.रामदास थोरे यांचे हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. लायन्स क्लब ऑफ कोपरगावचे श्री.राजेश ठोळे यांनी मनोगत व्यक्त करून रक्तदान केलेल्या रक्तदात्यांचे आभार मानले.
प्रसंगी महाराष्ट्र सहकारी पतसंस्था फेडरेशनचे कार्याध्यक्ष श्री.राजुदास जाधव, उपकार्याध्यक्ष श्री.सुदर्शन भालेराव, महासचिव डॉ.श्री.शांतीलाल शिंगी, खजिनदार दादाराव तुपकर, संचालिका सौ.अंजलीताई पाटील व मुख्य कार्यकारी अधिकारी सौ.सुरेखा लवांडे आदींनी सदिच्छा भेट दिली. विविध शैक्षणिक, सामाजिक, राजकीय संघटना व सहकारी संस्थांच्या वतीने आणि वैयक्तिकरित्या सत्कार करण्यात आला. समता पतसंस्थेचे संचालक श्री.निरव रावलिया यांनी ७५ वेळा रक्तदान केले त्यामुळे एक सामाजिक दायित्वाच्या बाबतीत एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्या हस्ते रक्तदान शिबिराचे उद्घाटन दीपप्रज्वलन करून करण्यात आले. तसेच शिर्डी येथील श्री साईनाथ हॉस्पिटलचे रक्त संक्रमण अधिकारी डॉ.सुप्रिया सुंभ, सविता मानकर,शिवाजी आवळेकर,श्री.चंद्रकांत लुटे, विजया निर्मळ, सुनिता वाघमारे, अमोल देवकर, सचिन साप्ते,.दीपक डांगे,अप्पा कुमावत, आदींनी रक्त संकलनासाठी मोलाचे सहकार्य केले.
शिबीर यशस्वितेसाठी समता चॅरिटेबल ट्रस्ट, समता नागरी सहकारी पतसंस्थेचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, लायन्स क्लब ऑफ कोपरगाव चे पदाधिकारी सर्वश्री.राजेश ठोळे, अक्षय गिरमे,अमित लोहाडे, सुमित भट्टड,तसेच लिओ क्लब ऑफ कोपरगाव अध्यक्ष श्री.आदित्य गुजराथी व पदाधिकारी, कोपरगाव व राहाता येथील लिंगायत संघर्ष समितीचे प्रदीप साखरे, शिवकुमार सोनेकर, शाम जंगम, अमोल राजूरकर व पदाधिकारी आदींनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आणि उपस्थितांचे आभार कोपरगाव लिंगायत संघर्ष समितीचे श्री प्रदीप साखरे यांनी मानले.