समतातील राज्यस्तरीय विझ किड्स स्पर्धेचे बक्षीस वितरण संपन्न
समता वार्ता कार्यकारी संपादक पोपट साळवे
समतातील राज्यस्तरीय विझ किड्स स्पर्धेचे बक्षीस वितरण संपन्न
कोपरगाव : समता इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांच्या वाढदिवसानिमित्त स्कूलमध्ये राज्यस्तरीय विझ किड्स (व्यक्तिमत्त्व विकास) स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर राज्यस्तरीय स्पर्धेला महाराष्ट्रातुन विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.या स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना २५ सप्टेंबर २०२१ रोजी कोपरगाव शहरातील कलश मंगल कार्यालयात महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन संचालित सहकार उद्यमी व समता महिला बचत गट आयोजित कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या बारामती येथील भीमथडी यात्रेच्या संयोजिका सौ सुनंदाताई पवार यांच्या हस्ते बक्षिसे आणि ट्रॉफी देऊन उत्साहात संपन्न झाला.
सिनियर व ज्युनियर गटातील यशस्वी विद्यार्थ्यांना प्रथम पारितोषिक ७ हजार रुपये व ट्रॉफी,व्दितीय पारितोषिक ५ हजार रुपये व ट्रॉफी आणि तृतीय पारितोषक ३ हजार रुपये व ट्रॉफी देण्यात आली.
सिनियर गटात साईल हसे श्रीरामपूर,श्रेया लिंगायत नाशिक रोड, आणि वृषाली कानीचे नाशिक यांनी अनुक्रमे प्रथम,द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळविला तर ज्युनियर गटात प्रथम क्रमांक प्रथमेश भट्टड कोपरगाव, द्वितीय क्रमांक आदिती जोरी अहमदनगर आणि तृतीय क्रमांक अवनी नरवाडे कोपरगाव यांना मिळाला.व्यक्तिमत्व विकास तज्ज्ञ सौ प्रतिभा पाटील, सौ.आस्था तिरमखे, मिस बहार शेख आणि डॉ सौ राधिका वाघ यांनी सहभागी विद्यार्थ्यांचे परीक्षण करून परीक्षकाची भूमिका पार पाडली.
कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या सौ सुनंदाताई पवार, महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन आणि समता नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे, नाशिक येथील विसडम एक्सट्राच्या संचालिका सौ दिपाली चांडक, सहकार उद्यमीच्या अध्यक्षा सौ अंजली पाटील,समता महिला बचत गटाच्या अध्यक्षा सौ सुहासिनी कोयटे, स्कूलच्या मॅनेजिंग ट्रस्टी सौ.स्वाती कोयटे,शैक्षणिक संचालिका सौ.लिसा बर्धन, उपप्राचार्य श्री समीर अत्तार आदींनी राज्यस्तरीय स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.बक्षीस वितरण समारंभाचे सुत्रसंचालन उपप्राचार्य श्री समीर अत्तार यांनी केले तर शैक्षणिक संचालिका सौ लिसा बर्धन यांनी उपस्थितांचे आभार मानले.