समता दिनदर्शिका प्रकाशन म्हणजे समतेची खरी पहाट – श्री शांताराम गोसावी, मुख्याधिकारी; समता दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा संपन्न
समता वार्ता कार्यकारी संपादक पोपट साळवे
समता दिनदर्शिका प्रकाशन म्हणजे समतेची खरी पहाट – श्री शांताराम गोसावी, मुख्याधिकारी;
समता दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा संपन्न
कोपरगाव : समता दिनदर्शिका प्रकाशन म्हणजे समतेची खरी पहाट असून आज प्रकाशनाच्या निमित्ताने समताचा सहकार क्षेत्रात अगरबत्ती व कापूर उत्पादनातून सुगंध दरवळणार आहे आणि हे जे समताचे यश,ध्येय काका कोयटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार क्षेत्राला दीपस्तंभा सारखे आहे.
समताला आता पारंपारिक दृष्टीने एक विशिष्ट पद्धतीने वाटचाल न करता आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून समताची उंच उंच अशी उड्डाण घ्यायची वेळ आलेली आहे. असे गौरवोद्गार कोपरगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्री शांताराम गोसावी यांनी काढले.
समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या सन २०२२ च्या समता दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा १३ डिसेंबर २०२१ रोजी स्व.मोहनलाल आनंदराम झंवर सभागृहात संपन्न झाला. प्रसंगी ते बोलत होते.
तर प्रकाशन सोहळ्याचे अध्यक्षस्थान तहसिलदार श्री विजय बोरुडे यांनी भूषविले.अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना म्हणाले की. कोपरगाव तालुक्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून कोपरगावातील व्यवसायाला चालना देण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असून भविष्याच्यादृष्टीने शहारा बरोबरच ग्रामीण भागातील व्यावसायिक समृद्ध कसे होतील यासाठी लवकरच समृद्धी महामार्गाचे अधिकारी आणि व्यापाऱ्यांची बैठक आयोजित करण्याचे नियोजन केले जाईल तसेच तरुण व्यापारी व्यावसायिकांना एक दिशा देणारा हा प्रकल्प ठरणार असून कोपरगाव शहराबरोबरच तालुक्यातील व्यापाऱ्यांना कोपरगाव तालुका व्यापारी महासंघ व समता पतसंस्थेच्या माध्यमातून संधी उपलब्ध करून देणार आहोत.
तसेच त्यांनी समताच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या तर कोपरगाव तालुका व्यापारी महासंघाचे कार्याध्यक्ष श्री सुधीर डागा यांनी व्यापारी महासंघाच्यावतीने मनोगत व्यक्त करत शहरातील व्यापाऱ्यांच्या समस्यांवर प्रकाश टाकला.
प्रकाशन सोहळ्याच्या प्रमुख पाहुण्यांचे स्वागत आणि कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे चेअरमन ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांनी केले. ते म्हणाले की,दरवर्षी समता दिनदर्शिकेचे प्रकाशन राज्यातील ५ जिल्ह्यातील १ लाख घरात जाऊन पोहचते त्यामुळे समता दिनदर्शिका ही सभासद, हितचिंतकापर्यंत संस्थेच्या योजना,उपक्रम पोहचविण्याचे महत्वाचे काम करत असते आणि संस्थेचे सभासदाशी असलेले नाते अधिक घट्ट करत असते.
प्रारंभी तहसिलदार श्री विजय बोरुडे, मुख्याधिकारी श्री शांताराम गोसावी यांनी समता नागरी सहकारी पतसंस्थेचे मुख्य कार्यालयाला भेट देऊन पतसंस्थेच्या दैनंदिन कामकाजाची माहिती जाणून घेत फॉरेन्सिक ऑडीट कंट्रोल रूम,ऑनलाईन समता रिकव्हरी पॅटर्न, सोनेतारण विभागाची कार्यप्रणाली समजून घेत कौतुक केले तर समताच्या सहकार उद्योग मंदिराला भेट देत सहकार मंदिरातील अगरबत्ती ,कापूर,कापसाची वाती, वस्त्र निर्मिती अशा विविध सुरु असलेल्या उत्पादनाविषयी माहिती जाणून घेतली.
यावेळी तहसीलदार श्री विजय बोरुडे यांचा सत्कार संस्थेचे चेअरमन काका कोयटे, मुख्याधिकारी श्री शांताराम गोसावी यांचा सत्कार संचालक श्री गुलशन होडे, श्री किरण शिरोडे आणि उपमुख्याधिकारी श्री ज्ञानेश्वर चाकणे यांचा सत्कार व्यापारी महासंघाचे सचिव श्री प्रदीप साखरे यांच्या हस्ते समता महिला बचत गटाच्या महिलांनी कलाकुसर करून अगरबत्ती व कापूर एकत्र बांधून तयार केलेला गुच्छ देऊन सन्मान करत सत्कार करण्यात आला.
प्रसंगी कोपरगाव नगरपालिकेचे उपमुख्याधिकारी श्री ज्ञानेश्वर चाकणे,महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष आणि समता नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे,संचालक श्री कचरू मोकळ,श्री गुलशन होडे,व्यापारी महासंघाचे कार्याध्यक्ष श्री सुधीर डागा,श्री किरण शिरोडे,श्री प्रदीप साखरे, नगरसेवक श्री जनार्दन कदम यांच्यासह समता पतसंस्थेचे सर्व कर्मचारी वृंद आदी उपस्थित होते.सोहळ्याचे सुत्रसंचालन एच.आर. श्रीमती उज्वला बोरावके यांनी केले तर उपस्थितांचे आभार व्यापारी महासंघाचे सचिव श्री प्रदीप साखरे यांनी मानले.