समताच्या मुख्य कार्यालयास लोणावळा व मालेगाव येथील पतसंस्थांची सदिच्छा भेट
कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे

समताच्या मुख्य कार्यालयास लोणावळा व मालेगाव येथील पतसंस्थांची सदिच्छा भेट
कोपरगाव : महाराष्ट्रातील अग्रगण्य समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयास पुणे जिल्ह्यातील लोणावळा येथील भगवान अग्रसेन सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष राजीव अग्रवाल, संचालक ॲड.गोविंद खंडेलवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी सौ.राजश्री कानडे आणि नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील भाग्यलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन उत्तमराव पाटील संचालक प्रविण केसकर, सुभाष नहीरे, कार्यकारी संचालक प्रेम पाटील, अकाउंटंट शैलेश बोरसे , वसुली अधिकारी सुनिल घुले, सूर्यवंशी जी. सहाय्यक वसुली अधिकारी सुमित पाटील, लिपिक राम पाटील, राहुल अहिरे आदी पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी यांनी २७ एप्रिल २०२४ रोजी सदिच्छा भेट दिली.
या वेळी समता पतसंस्थेचे चेअरमन ओमप्रकाश दादा तथा काका कोयटे, ठेव विभाग प्रमुख संजय पारखे यांनी आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मोबाईल बँकिंग, सेल्फ बँकिंग, व्हाऊचरलेस बँकिंग, क्यु.आर.कोड, फॉरेन्सिक ऑडीट कंट्रोल रूम, समता रिकव्हरी पॅटर्न, सोनेतारण विभाग या राज्यातील पतसंस्था चळवळीला दिशादर्शक असणारी अत्याधुनिक कार्य प्रणाली विषयी सविस्तर माहिती दिली. तसेच भगवान अग्रसेन पतसंस्थेचे अध्यक्ष राजीव अग्रवाल व भाग्यलक्ष्मी पतसंस्थेचे चेअरमन उत्तमराव पाटील यांचा सत्कार संस्थेचे चेअरमन काका कोयटे यांच्या हस्ते करण्यात आला. इतर पदाधिकारी, अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार ठेव विभाग प्रमुख संजय पारखे यांनी केला.
समता नागरी सहकारी पतसंस्थेचे कामकाज व अत्याधुनिक तंत्रज्ञान, कार्यप्रणाली आणि समता महिला बचत गटाच्या सहकार उद्योग मंदिराविषयी मिळालेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल भगवान अग्रसेन पतसंस्थेचे संचालक ॲड.गोविंद खंडेलवाल व भाग्यलक्ष्मी पतसंस्थेचे कार्यकारी संचालक प्रेम पाटील यांनी आभार मानले आणि पुढील आर्थिक प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या.