महिला सक्षमीकरणातून आर्थिक संपन्नता म्हणजे महिला बचत गट- सौ.सुहासिनी कोयटे
समता वार्ता कार्यकारी संपादक पोपट साळवे
महिला सक्षमीकरणातून आर्थिक संपन्नता म्हणजे महिला बचत गट– सुहासिनी कोयटे
कोपरगाव– महाराष्ट्रातील महिलांना व्यवसायात संधी उपलब्ध करून देत विविध महिला बचत गटांमार्फत महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवत एक परिपक्व कुटुंब बनविण्याचा संकल्प महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनने घेतलेला असून त्या अंतर्गत महिला बचत गटांसाठी विविध उपक्रमांद्वारे महिला बचत गटांद्वारे बनविलेल्या उत्पादनांना एक हक्काची बाजारपेठ तयार करून देत आहोत. महिला बचत गटांनी बनविलेल्या मालाला ऑनलाईन बाजारपेठ मिळवून देणे,महिला बचत गटांतर्गत विविध व्यवसायात उपयोगात येणाऱ्या मशिनरींची ओळख व्हावी तसेच बचत गटांतील महिलांना एकत्रित येऊन व्यवसाय करता यावा व आर्थिक प्रगती साधता यावी या उद्देशाने महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन संचलित ‘सहकार उद्यमी’ व ‘समता महिला बचत गट कोपरगाव’ आयोजित बारामती येथील सुप्रसिध्द भीमथडी जत्रा संयोजीका सौ.सुनंदाताई पवार यांच्या शुभहस्ते उद्योग मंदिराचे उद्घाटन शनिवार २५ सप्टेंबर २०२१ रोजी दुपारी ३.०० वाजता करण्यात येणार असून असोसिएशन ऑफ एशियन कॉन्फडरेशन ऑफ क्रेडिट युनियन (ACCU) च्या चीफ एक्झीक्युटीव्ह ऑफिसर इलेनिता सँड्रॉक या स्थानिक उत्पादनांना परदेशी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी ऑनलाईन मार्गदर्शन करणार आहेत तर केंद्र सरकारच्या ९०टक्के पर्यंत अनुदान मिळणाऱ्या स्फूर्ती योजनेअंतर्गत क्लस्टर योजनेच्या अधिकृत सल्लागार व नासिक येथील विसडम एक्स्ट्राच्या चीफ एक्झीक्युटीव्ह ऑफिसर सौ.दिपाली चांडक यांचेही मार्गदर्शन होणार असल्याची माहिती समता महिला बचत गटाच्या अध्यक्षा व सहकार उद्यमीच्या संचालिका सौ.सुहासिनीताई कोयटे यांनी दिली.
तसेच महिला बचत गट व गृहउद्योग उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचे उद्देशाने उत्पादनांचे प्रदर्शन व विक्री ‘गोदावरी महोत्सव २०२१’अंतर्गत भरविण्यात आले आहे. गृह उद्योग उत्पादनांना कोपरगाव येथील टॅबलॅब टेक्नॉलॉजीच्या सौजन्याने कॉप-शॉप वर्ल्ड पोर्टलची सुरुवात करण्यात येणार असून गृहउद्योगांना हक्काचे विक्री केंद्र उपलब्ध करून देण्यात येणार आहे. घरगुती व्यवसायास उपयुक्त रुपये ५ हजार पासून ते ५ लाख रुपया पर्यंतच्या ५० मशिनरींचे प्रदर्शन शार्प इंजिनीअरिंग वर्क्सच्या सौजन्याने स्मॉल मशिनरी एक्स्पो भरविण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणून डिझायनर सौ.रीना जाधव यांनी प्रसिद्ध डिझायनर सौ.सिमरन खुबाणी यांच्या मार्गदर्शनाखाली महिला बचत गटांनी तयार केलेले विविध फॅशनेबल ड्रेस साई आश्रया अनाथ आश्रमातील मुली परिधान करून फॅशन शो (रॅम्प वॉक) करणार आहे अशी माहिती सहकार उद्यमीच्या अध्यक्षा व नाशिक येथील कल्याणी महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन सौ.अंजलीताई पाटील यांनी केले.
सदर कार्यक्रम कोपरगाव शहरातील कलश मंगल कार्यालय आण्णाभाऊ साठे चौक येथे २५ सप्टेंबर २०२१ रोजी दुपारी ३.०० वा उद्योग मंदिराचे उद्घाटन होणार असून दुपारी ४.०० ते रात्री ९.०० व २६ सप्टेंबर २०२१ रोजी सकाळी १०.०० ते रात्री ९.०० या दरम्यान महिला बचत गट व स्थानिक उत्पादनांचे प्रदर्शन भरविण्यात आलेले आहे. तरी सहकार उद्यमी व समता महिला बचत गटाने आयोजित केलेल्या प्रदर्शनाच्या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा असे आवाहन सहकार उद्यमीच्या संचालिका व श्रीपाल नागरी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन सौ.भारती मुथा यांनी केले.