समता अभ्यास मंदिर व्यवस्थापन समितीची बैठक संपन्न
कोपरगाव : कोपरगाव नगरपालिका व समता नागरी सहकारी पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने उभारण्यात आलेल्या समता अभ्यास मंदिर व्यवस्थापन समितीची बैठक समता पतसंस्थेचे चेअरमन ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
प्रसंगी समता अभ्यास मंदिराची यशाची परंपरा कायम ठेवत मंदिरातील विद्यार्थी मनीष अशोक आव्हाटे यांची जलसंपदा विभागात असिस्टंट सिव्हिल इंजिनियर पदी निवड झाल्याबद्दल आणि हर्षा शैलेंद्र बनसोडे हिने भारताचे प्रतिनिधित्व करत परदेशात कौतुकास्पद यश संपादन केल्याबद्दल समता पतसंस्थेचे चेअरमन काका कोयटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. अभ्यास मंदिरातील विद्यार्थ्यांनीही मनोगत व्यक्त करत त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या वेळी समता अभ्यास मंदिर व्यवस्थापन समितीचे सदस्य सुधीर डागा, सेवानिवृत्त प्राचार्य डॉ. जी बी गायकवाड, डॉ. सुभाष रणधीर, प्रा. शैलेंद्र बनसोडे, सौ. बनसोडे, अशोक आव्हाटे, समता अभ्यास मंदिर इन्चार्ज प्रा.पोपट साळवे, नगरपालिकेचे महेश थोरात, विद्यार्थी प्रतिनिधी आदित्य बारसे, विद्यार्थिनी प्रतिनिधी स्नेहा मोरे, रूपाली काटकर आदींसह अभ्यास मंदिरातील विद्यार्थी उपस्थित होते.