चेक न वटल्याने समताच्या थकीत कर्जदारास कारावासाची शिक्षा व नुकसान भरपाई देण्याचा आदेश
कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे

चेक न वटल्याने समताच्या थकीत कर्जदारास कारावासाची शिक्षा व नुकसान भरपाई देण्याचा आदेश
कोपरगाव : समता नागरी सहकारी पतसंस्था मर्या. कोपरगाव यांचे थकीत कर्जदार योगेश हरीभाऊ ठोंबरे यांनी कर्जाच्या थकबाकी पोटी दिलेला चेक “न” वटल्याने त्यांचे विरुध्द कोपरगाव येथील न्यायालयात दि. निगोशिएबल इन्स्ट्रूमेंट ॲक्टच्या कलम १३८ अन्वये फौजदारी केस दाखल करण्यात आली होती.
आरोपी योगेश ठोंबरे यास दोषी धरुन प्रथम वर्ग मा. न्यायदंडाधिकारी बनसोड मॅडम यांनी ६ महिने साध्या कारावासाची शिक्षा व फिर्यादी पतसंस्थेला नुकसान भरपाई म्हणून रु.२४,६००/- रक्कम न दिल्यास ३ महिने पुन्हा साध्या कारावासाची शिक्षा सुनावली.
फिर्यादी समता पतसंस्थेतर्फे दिनेश गायकवाड व आय.सी.आय.सी.आय बँकेचे रिलेशनशिप मॅनेजर सागर गुरसळ यांचे जबाब महत्वपूर्ण ठरले. समता पतसंस्थेच्या वतीने ॲड.सोपानराव पठारे यांनी बाजु मांडली व कायदेशीर पुरावे दिले.
या प्रसंगी पतसंस्थेचे जनरल मॅनेजर सचिन भट्टड व वसुली विभागाचे असि.जनरल मॅनेजर जे.एस.कदम यांनी सांगितले की, थकीत कर्जदारांनी त्यांच्याकडे असणारी थकीत कर्जाची रक्कम भरणा करावी व कर्ज खाते नियमित ठेवावे.