‘लिओ दांडिया रास’ स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ संपन्न
कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे
‘लिओ दांडिया रास’ स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ संपन्न
कोपरगाव : सुधन गोल्ड लोन प्रस्तुत लायन्स, लिओ व लिनेस क्लब ऑफ कोपरगाव आणि सखी सर्कल वुमेन्स ग्रुप आयोजित लिओ दांडिया रास स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ स्व.यशवंतराव चव्हाण समता सहकार सभागृहात उत्साहात संपन्न झाला. ‘लिओ दांडिया रास’ स्पर्धा नवरात्र उत्सवानिमित्त १९ ऑक्टोबर २०२४ रोजी कोपरगाव शहरातील साई सिटी येथील हॉलमध्ये स्पर्धेचे उद्घाटन कोपरगाव तालुक्याचे आमदार आशुतोष काळे, ए डी सी सी बँकेच्या माजी संचालिका सौ.चैताली काळे, महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे, कोपरगाव नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा सौ.सुहासिनी कोयटे गोदावरी दूध संघाचे चेअरमन राजेश आबा परजणे आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली होती.
तुलसीदास खुबानी ज्वेलर्स कडून कृपास्पर्श ग्रुपला उत्कृष्ट गरबा नृत्याबद्दल रोख ११ हजार रुपयांचे बक्षीस व सन्मान चिन्ह देण्यात आले. आकांक्षा शर्मा व दिव्या शर्मा, प्रेरणा जैन व मयुरी जैन, क्रिया पोरवाल व भाविका धाडीवाल या उत्कृष्ट गरबा नृत्य करणाऱ्या कपलला विसपुते सराफ यांच्याकडून प्रत्येकी ३ हजार रुपयांचे रोख बक्षीस व सन्मान चिन्ह तर वैशाली ऑटोमोबाईल्स कडून कशिश शर्मा, प्रियंका आर्या, मधु उपाध्याय यांनी उत्कृष्ट गरबा नृत्य केल्याबद्दल प्रत्येकी २ हजार १०० रुपये रोख व सन्मानचिन्ह देण्यात आले.
तसेच रितिक परदेशी, कृष्णा चव्हाण, विवेक पटेल या तीन स्पर्धकांना उत्कृष्ट गरबा नृत्याबद्दल साई ज्योती पिल्स हॉस्पिटल कडून प्रत्येकी २ हजार १०० रुपये रोख व सन्मानचिन्ह बक्षीस रूपात देण्यात आले. लहान मुलांमध्ये उत्कृष्ट गरबा नृत्य करणाऱ्या वद्य पटेल, नायिया साजिद, तनिष आढाव व अन्वी यादव या स्पर्धकांना प्रत्येकी ५०० रुपये रोख बक्षीस व सन्मान चिन्ह तसेच उत्कृष्ट वेशभूषा लहान स्पर्धकांमध्ये नक्षत्रा परदेशी, कृष्णाव पटेल, वद्य पटेल, धार्मिक पटेल या स्पर्धकांना प्रत्येकी ५०० रुपये रोख व सन्मानचिन्ह दिले गेले.
सन्मती फायनान्शिअल ग्रुप कडून आदिशक्ती ग्रुपला उत्कृष्ट वेशभूषा केल्याबद्दल रोख ८ हजार रुपये व स्मृतिचिन्ह तर भारत एफ.आर.पी.कडून कृष्णा व राधा, दिव्या शर्मा व आकांक्षा शर्मा, प्रेरणा जैन व मयुरी जैन या तीन उत्कृष्ट वेशभूषा करणाऱ्या कपलला प्रत्येकी ३ हजार रुपये रोख व सन्मानचिन्ह दिले गेले. तर गुरु डिजिटल कडून कशिश शर्मा, तेजस्विनी यादव, आशु परदेशी या तीन महिला स्पर्धकांनी उत्कृष्ट वेशभूषा केल्याबद्दल प्रत्येकी २ हजार १०० रुपये रोख व सन्मानचिन्ह बक्षीस रूपात देण्यात आले.
विमल फर्निचर कडून आयुष ठोळे, विशाल वाडेकर, भाविक रावल या तीन पुरुष स्पर्धकांनी उत्कृष्ट वेशभूषा केल्याबद्दल प्रत्येकी २ हजार १०० रुपये रोख बक्षीस व सन्मानचिन्ह देण्यात आले. जेडी बिल्डर्स अँड इंटेरियर कडून उत्कृष्ट थ्री पीस बद्दल आंचल डागा व हर्षद बनसोडे आणि उत्कृष्ट गरबा रिल्स मध्ये डॉ.दिपाली आचार्या यांना प्रत्येकी २ हजार १०० रुपयांचे रोख बक्षीस व सन्मान चिन्ह देण्यात आले.
या वेळी सुधन गोल्ड लोनचे अध्यक्ष संदीप ओमप्रकाश कोयटे, उद्योजक राजेश कैलास ठोळे, खुबानी ज्वेलर्सचे तुलसीदास खुबानी आणि विसपुते ज्वेलर्सचे दिपक विसपुते आदींसह प्रायोजकत्व मिळालेल्या संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी धीरज कराचीवाला, मानस नागरे, करण शहा, आदित्य गुजराती, पृथ्वी शिंदे, हर्षल होडे, शुभम भडकवाडे, सुमित सिनगर, हर्षल कृष्णानी, कुशल कोठारी, उत्कर्ष काले, प्रणव गुजराती, सम्यक गंगवाल, कुशल काले, रौनक काले, मुकुंद भट्टड, ओमकार भट्टड, हर्षल जोशी, जय धाडीवाल, निखिल खुबानी, प्रशिल ठोळे, शुभम अग्रवाल, यश विसपुते, सर्वेश मंडलिक, हिमांशू छाजेड, अक्षय धाडीवाल वैभव भडकवाड, सम्यक फुलफगर आदी लिओ क्लब ऑफ कोपरगाव पदाधिकारी, सदस्य यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रदीप साखरे यांनी केले. उपस्थितांचे आभार धीरज कराचीवाला यांनी मानले.