समता परिवाराचे संस्थापक काका कोयटे यांच्या हस्ते अंध व्यक्तींना दिवाळी निमित्त किराणा किटचे वितरण
समता वार्ता कार्यकारी संपादक पोपट साळवे
समता परिवाराचे संस्थापक काका कोयटे यांच्या हस्ते अंध व्यक्तींना दिवाळी निमित्त किराणा किटचे वितरण
कोपरगाव : दिवाळीचा सण हा गरीब,श्रीमंत यामध्ये समाविष्ट होणाऱ्या प्रत्येक मानवजातीचा असतो या सणाला अनेक वर्षांचा सांस्कृतिक वारसा लाभलेला असून आजही या सणाला महत्त्वाचे स्थान आहे या सणानिमित्ताने शहरातील अंध व गरजू नागरिकांना समता पतसंस्थेत दिवाळीनिमित्त किराणा किट व फराळाचे वाटप करण्यात आले ही आनंदाची बाब असून कौतुकास्पद बाब ही आहे की या कार्यक्रमाचे आयोजन देखील अजय तांबे या अंध व्यक्तीने केले होते.अशा व्यक्तींना समता नागरी सहकारी पतसंस्था नेहमीच सहकार्य करते आणि यापुढे ही करत राहील. असे प्रतिपादन समता परिवाराचे संस्थापक ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांनी केले.
समता नागरी सहकारी पतसंस्थेत ३१ ऑक्टोबर २०२१ रोजी अंध व्यक्तींना दिवाळीनिमित्त किराणा किट आणि फराळाचे वितरण करण्यात आले त्या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते तसेच त्यांचे हस्तेच किराणा किटचे वाटप करण्यात आले.प्रसंगी प्रमुख पाहुण्यांचा सत्कार सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्री प्रदीप नवले यांनी केला तर समताचे जनरल मॅनेजर श्री सचिन भट्टड यांचा सत्कार आहेरराव ज्वेलर्सचे श्री सुनिल आहेरराव यांनी केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अजय तांबे यांनी केले ते म्हणाले की,समाजात अंध व्यक्तींना अंध असणे ही कमजोरी न समजता एक ताकद म्हणून अंधत्वाकडे पाहिले पाहिजे कारण की आजही आपल्यासारख्या अंध व्यक्तींना सहकार्य करणारे दानशूर कोपरगाव तालुक्यात असून आपल्याला नेहमीच या सर्वांचे सहकार्य मिळत असते त्यांच्या सहकार्यानेच आज या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
अंध व्यक्तींना देण्यात येणाऱ्या किटसाठी समता नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे,सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्री प्रदीप नवले, श्री अनिल बोरा रोटरी क्लब,पुणे अजित सिंगी कोपरगाव,श्री विनोद कांबळे श्रीरामपूर, लेखक,निर्माता श्री भरत मोरे, ओम साई एज्युकेशन शैक्षणिक संस्थेचे श्री परशराम साबळे, आहेरराव ज्वेलर्सचे सुनिल आहेरराव,कोपरगाव गॅस कंपनीचे श्री अविनाशजी सातपुते यांनी आर्थिक साहाय्य करून किट उपलब्ध करून दिल्या.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आणि उपस्थितांचे आभार श्री अजय तांबे यांनी मानले.