आरोग्य व शिक्षणब्रेकिंगमहाराष्ट्र

समता पॅटर्न अहमदनगर जिल्ह्यात सलग पाचव्यांदा अव्वल

संपादक , मार्गदर्शक श्री. ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे

समता पॅटर्न अहमदनगर जिल्ह्यात सलग पाचव्यांदा अव्वल

समता वार्ता वृत्तसंस्था –  सी.बी.एस. ई.चा २०२०-२१ चा इयत्ता १०वी चा निकाल नुकताच जाहीर झाला. त्यामध्ये समता इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थांनी अहमदनगर जिल्ह्यात बाजी मारत अविक शिवांकर मंडल याने ९८ टक्के गुण मिळवुन स्कूल मध्ये प्रथम येण्याचा मान मिळविलेला आहे. तर पूर्वा सचिन कोठारी हिने ९७.०८ टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमाक तर समृद्धी विष्णु दावभट हिने ९७ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला, समता स्कूलचे या वर्षी सर्वच  विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण होऊन समता पॅटर्न अहमदनगर जिल्ह्यात सलग पाचव्यांदा अव्वल ठरत स्कूलचा निकाल १०० टक्के लागला आहे.

अविक शिवांकर मंडल
पूर्वा सचिन कोठारी
समृद्धी विष्णु दावभट

समता स्कूल मधील ५ विद्यार्थी ९५ टक्के च्या पुढे गुण मिळवुन उत्तीर्ण झाले आहे. त्यामध्ये अविक मंडल,पूर्वा कोठारी, समृद्धी दावभट,मेधा शहा,पौरवी रहाणे या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. ८० ते ९० टक्के च्या दरम्यान गुण मिळविणारे ४२ विद्यार्थी असून इंग्रजी विषयात अविक मंडल, पूर्वा कोठारी, रुजुल रोहमारे, यांनी १०० पैकी ९७  गुण मिळविले, हिंदी विषयात समृद्धी दावभट हिने १०० पैकी १०० गुण मिळविले आहे. गणित विषयात अविक मंडल, पूर्वा कोठारी, मेधा शहा यांनी १०० पैकी ९९ गुण मिळविले. विज्ञान विषयात अविक मंडल १०० पैकी ९७ गुण तर समाजशास्त्र या विषयात पूर्वा कोठारी हिने १०० पैकी ९९ गुण मिळविले आहे. निधीशा आव्हाड, सिद्धी शिंगी, श्रेया आढाव, तनिषा लुटे, स्नेहल पाटील, दिग्विजय ताडगे, अंजली भामरे, श्रेयस भोसले, वंश चावला, अदिती पटारे, तुलसी न्याती, नक्षत्र ठाणगे, तन्वी वाबळे, नेहा मुंजे, तन्वी लालसरे, रुजुल रोहमारे, रुपेश डहाळे, निष्ठा भुसारी, अद्वैत मापारी, सुचिता पवार, अक्षत ठोळे, अभिनंदन बंगाळ, अथर्व भाकरे या विद्यार्थ्यांनी ९० टक्के च्या पुढे गुण मिळवत यश संपादन केले आहे.

‘समता इंटरनॅशनल स्कूल सलग ५ व्या वर्षात जिल्ह्यात अग्रगण्य राहण्याची परंपरा राखत पुनः एकदा समता पॅटर्न यशस्वी केला आहे. कोरोनासारख्या अतिभयंकर महामारीच्या काळात कोणत्याही प्रकारचे परीक्षेबरोबरच कोरोनाचे मानसिक दडपण न घेता परिस्थितीनुरूप अभ्यास करत समता इंटरनॅशनल स्कूलचे २०२०-२१ च्या इयत्ता १०वी चे विद्यार्थी सी.बी.एस.ई. पुरस्कृत अभ्यासक्रमांत उत्तुंग भरारी मारली आहे.’ असे प्रतिपादन समता इंटरनॅशनल स्कूलच्या मॅनेजिंग ट्रस्टी सौ.स्वाती कोयटे यांनी केले.

तसेच त्या पुढे बोलतांना म्हणाल्या कि, समता इंटरनॅशनल स्कूल ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देणारी संस्था म्हणून नावारूपाला आलेली संस्था आहे. आम्ही  विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अभ्यासक्रमाबरोबरच विविध उपक्रम राबवीत असतो. ‘leave no child behind’ स्कूलच्या  ब्रीदवाक्याप्रमाणे समता इंटरनॅशनल स्कूलच्या व्यवस्थापन समितीच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी शाळेतील कोणताही विद्यार्थी आयुष्यात शैक्षणिकदृष्ट्या कमी पडू नये हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन इयत्ता पहिली पासूनच विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रमांतर्गत अभ्यासक्रम पूर्ण करून घेत असतात. तसेच इयत्ता १०वी ला आल्यानंतर गरजेनुसार गुणवत्तेनुसार शैक्षणिक, मानसिकदृष्ट्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाते. मार्गदर्शनामुळे समता स्कूलच्या विद्यार्थ्यांनी मिळविलेले यश हे शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या  कष्टाचेच  फळ आहे’.

या सर्व उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे समता इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे, मॅनेजिंग ट्रस्टी सौ.स्वाती कोयटे, मुख्य कार्यवाहक संदीप कोयटे,व्यवस्थापन समितीचे सदस्य, शैक्षणिक संचालिका सौ.लिसा बर्धन, उपप्राचार्य श्री.समीर अत्तार, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तालुक्यातील सर्व स्तरातून यशस्वी सर्व विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे