ब्रेकिंगमहाराष्ट्र

न्यातीज समता इंटरनॅशनल स्कूलमध्ये क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न

समता वार्ता कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे

न्यातीज समता इंटरनॅशनल स्कूलमध्ये क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न

कोपरगाव : विद्यार्थ्यांमधील कला-गुण विकसित होत विद्यार्थी हा शारीरिक व मानसिक दृष्ट्या सक्षम होण्याचे न्यातीज समता इंटरनॅशनल स्कूल हे केंद्र आहे.या शैक्षणिक संस्थेमधून सक्षम विद्यार्थी घडत आहेत.त्यामुळे ही संस्था विद्यार्थ्यांचे उज्वल भविष्य घडविणारी संस्था असल्याचे गौरवोद्गार श्रीरामपूर तालुक्याचे डी वाय एस पी श्री संदीप मिटके यांनी न्यातीज समता इंटरनॅशनल स्कूलमध्ये घेण्यात आलेल्या क्रीडा स्पर्धांच्या बक्षीस वितरण प्रसंगी काढले.

श्रीरामपूर येथील न्यातीज समता इंटरनॅशनल स्कूलमध्ये दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.या क्रीडा स्पर्धांचे बक्षीस वितरण समारंभाचे प्रमुख पाहुणे श्रीरामपूर तालुक्याचे डी वाय एस पी श्री संदीप मिटके होते तर क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन प्रमुख पाहुणे डॉ प्रशांत कदम यांच्या हस्ते करण्यात आले. महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन अध्यक्ष व समता इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे,समता स्कूलच्या मॅनेजिंग ट्रस्टी सौ स्वाती कोयटे,शैक्षणिक संचालिका सौ लिसा बर्धन,न्यातीज स्कूलच्या सेक्रेटरी श्री राकेश न्याती,शालेय समितीच्या सदस्य सौ कोमल न्याती,सौ वैशाली न्याती,शाळेच्या उपमुख्याध्यापिका सौ सोनल चोबे यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला.

या क्रीडा स्पर्धांमध्ये क्रिकेट,खो-खो, फुटबॉल, रिले,थाळीफेक, गोळा फेक,स्केटिंग,चेस,रनिंग, बॅडमिंटन, दोर उडी,टेबल टेनिस,अडथळा शर्यत, रस्सी खेच आदी प्रकारच्या खेळांचा समावेश होता.शाळेच्या क्रीडा व्यवस्थापन समितीने या स्पर्धेअंतर्गत विद्यार्थ्याचे चार हाऊस करण्यात आले होते.त्यात कॉसमॉस हाऊस, ओयसिस हाऊस,प्लॅटिनम हाऊस, झेनिथ हाऊस या हाऊस अंतर्गत इन डोअर व आऊट डोअर स्पर्धा घेण्यात आल्या.या हाऊस पैकी क्रीडा प्रकारात समाविष्ट असलेल्या क्रीडा प्रकारात झेनिथ हाऊसला प्रथम क्रमांक मिळाला.या हाऊस मधील सहभागी विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक राखी सुराडकर,सोहेल पटेल,संतोष पवार आदींचे मार्गदर्शन लाभले.या वर्षीच्या आदर्श विद्यार्थी पुरस्काराचे वितरण देखील या प्रसंगी करण्यात आले.वरिष्ठ गटात आर्य देशमुख,इसिका सहानी तर कनिष्ठ गटात तीर्थ कोठारी,अनन्या सोमाणी यांना देण्यात आला.क्रीडा स्पर्धेतील विजयी खेळाडू आणि आदर्श विद्यार्थी यांना स्मृतिचिन्हे,भरघोस बक्षिसे आणि प्रमाणपत्रे देण्यात आली.स्पर्धा यशस्वीतेसाठी वसीम शेख,भारती कडू,आशिष गायकवाड, जुनेद शेख,अनुजा कुलकर्णी,स्नेहल भाबड,सचिन गायकवाड,कश्मीरा पिंजारी,उद्धव म्हस्के,रुखसार इनामदार,अविनाश जाधव,संजीवनी थोरात आदी शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे