सरकारी बँकेतील तंत्रज्ञानापेक्षा समताचे अत्याधुनिक तंत्रज्ञान सरस – शिवकुमार पाटील, चेअरमन सिद्धेश्वर सहकारी बँक
कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे
सरकारी बँकेतील तंत्रज्ञानापेक्षा समताचे अत्याधुनिक तंत्रज्ञान सरस – शिवकुमार पाटील, चेअरमन सिद्धेश्वर सहकारी बँक
कोपरगाव : समता नागरी सहकारी पतसंस्थेने आधुनिक तंत्रज्ञानाबाबत उत्तुंग गरुड झेप घेतली आहे. सेल्फ बँकिंग प्रणाली, व्हाऊचरलेस बँकिंग प्रणाली, फॉरेन्सिक ऑडिट कंट्रोल रूम, मोबाईल बँकिंग, ऑनलाइन समता रिकव्हरी पॅटर्न या कार्यप्रणाली विशेष उल्लेखनीय असून तंत्रज्ञानाच्या बाबतीत सरकारी, खाजगी बँकेलाही लाजवेल असे तंत्रज्ञान समता पतसंस्थेकडे असल्याने बँकांपेक्षाही समता पतसंस्थेचे अत्याधुनिक तंत्रज्ञान हे सरस असल्याचे गौरवोद्गार लातूर जिल्ह्यातील सिद्धेश्वर सहकारी बँकेचे शिवकुमार पाटील यांनी काढले.
समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयास लातूर जिल्ह्यातील सिद्धेश्वर सहकारी बँकेचे चेअरमन शिवकुमार पाटील, व्हा.चेअरमन ॲड. उमाशंकर पाटील, संचालक डॉ.कल्याण उटगे, राजेंद्र (आबा) मुंडे, ॲड.शिवराज सुगरे, रामचंद्र आलुरे, भीमाशंकर बेंबळकर, युवराज लोखंडे प्रा.सौ.चंद्रकला रोट्टे, श्रीमती सुखदा मांडे, सुनीता लोहारे आदी पदाधिकाऱ्यांसह लिपिक प्रशांत मिटकरी, दीपक पाटील, सूर्यकांत मोरे, शैलेश खराडे यांनी २९ जानेवारी २०२४ रोजी सदिच्छा भेट दिली.
या वेळी समता पतसंस्थेचे संचालक संदीप ओमप्रकाश कोयटे, ठेव विभाग प्रमुख संजय पारखे यांनी आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मोबाईल बँकिंग, सेल्फ बँकिंग, व्हाऊचरलेस बँकिंग, क्यु.आर.कोड, फॉरेन्सिक ऑडीट कंट्रोल रूम, समता रिकव्हरी पॅटर्न, सोनेतारण विभाग आदी राज्यातील पतसंस्था चळवळीला दिशादर्शक असणारी अत्याधुनिक कार्य प्रणाली विषयी सविस्तर माहिती दिली.तसेच सिद्धेश्वर सहकारी बँकेचे चेअरमन शिवकुमार पाटील व संचालक मंडळाचा सत्कार समता पतसंस्थेचे संचालक संदीप कोयटे यांच्या हस्ते करण्यात आला.
समता नागरी सहकारी पतसंस्थेचे कामकाज व आत्याधुनिक तंत्रज्ञान, कार्यप्रणाली विषयी मिळालेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल सिद्धेश्वर सहकारी बँकेचे व्हा.चेअरमन उमाशंकर पाटील यांनी आभार मानले आणि पुढील आर्थिक प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या.