कोपरगाव शाखेत ग्राहक, ठेवीदार व अल्पबचत प्रतिनिधींचा सत्कार
कोपरगाव – समता नागरी सहकारी पतसंस्था दिवसेंदिवस ग्राहक, सभासद, ठेवीदार यांचे हिताचे निर्णय घेत असून सुरवातीला आर्थिक व्यवहार करताना चलनाचा वापर केला जात होता पण आता संस्थेने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मोबाईल बँकिंगचे माध्यमातून तत्पर सेवा देत आहे. व्हाऊचरलेस बँकिंग, आर.टी.जी.एस., एन. ई. एफ. टी.,यु.पी.आय. सिस्टीम, क्यु.आर.कोड आदि प्रकारच्या आधुनिक तंत्रज्ञानातून सुविधा ग्राहकांना देण्यात येत आहे. त्यामुळे ग्राहक, ठेवीदार यांना अधिकाधिक सेवा देत असल्याने ग्राहकांशी समताचे संबंध अधिक घनिष्ट बनत चालले आहे. तसेच संस्थेच्या आर्थिक प्रगतीमध्ये अल्प बचत ठेवीदारांचा देखील सिंहाचा वाटा आहे. अल्प बचत ठेव अंतर्गत समताचे प्रतिनिधी शहराबरोबरच ग्रामीण भागातील प्रत्येक ठेविदारांपर्यंत पोहचत असून जास्तीत जास्त अल्प बचत ठेवी जमा करत आहे. त्यामुळे समता पतसंस्था शहरातील ठेवीदारांनाच नाही तर ग्रामीण भागातील ठेवीदारांच्या ठेवींना सुरक्षितता देण्याचे काम लिक्विडीटी बेस प्रोटेक्शन फंडाच्या माध्यमातून विश्वासाने करत आहे. असे प्रतिपादन समता नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांनी केले.

समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या स्व.यशवंतराव चव्हाण समता सहकार सभागृहात कोपरगाव शाखेतील अल्प बचत ठेव प्रतिनिधी नियमित ग्राहकांच्या ७ सप्टेंबर २०२१ रोजी आयोजित बैठकीत सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते. या बैठकी दरम्यान संस्थेचे नियमित ठेवीदार सर्वश्री सुनील जोशी, सौ.अस्मिता जोशी, बाबुराव सातपुते, नितीन हलवाई, सागर शिंदे. नियमित ग्राहक म्हणुन सर्वश्री लक्ष्मण दवंगे, व विजय खैरनार, संदीप पुरी, कमलेश जाधव, ईश्वर लकारे तर अल्प बचत ठेव आणणाऱ्या जास्तीत जास्त प्रतिनिधींपैकी सर्वश्री पंजाबी चरणजीत, योगेश होते,जिजाबाई मोरे, सौ.सुनिता आचारी आनंद पहाडे आदींचा संस्थेचे चेअरमन श्री.ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे, संचालक संदीप कोयटे, जनरल मॅनेजर. सचिन भट्टड यांच्या शुभ हस्ते सत्कार करण्यात आला. समता पतसंस्थेचे संचालक संदीप कोयटे यांनीही उपस्थित ग्राहक, ठेवीदार, अल्प बचत ठेव योजनेचे प्रतिनिधींशी चर्चा करून त्यांच्या असणाऱ्या विविध समस्या सोडविण्याचा विश्वास दिला.
बैठकीचे सुत्रसंचलन कोपरगाव शाखाधिकारी श्री.आप्पासाहेब कोल्हे यांनी केले. सत्काराचा कार्यक्रम यशस्वितेसाठी कोपरगाव शाखेच्या कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. उपस्थितांचे आभार मुख्य कार्यालयाचे ऑडीट प्रमुख श्री. संजय पारखे यांनी मानले.



