आज समताच्या सभासद व कर्मचाऱ्यांना दिला गणेशाची आरती करण्याचा मान – संदीप कोयटे
समता वार्ता कार्यकारी संपादक पोपट साळवे
आज समताच्या सभासद व कर्मचाऱ्यांना दिला गणेशाची आरती करण्याचा मान – संदीप कोयटे
कोपरगाव-ब्रिटिश काळात समाजसुधारक लोकमान्य टिळकांनी गणेश चतुर्थीनिमित्त गणेशाची स्थापना करून लोकांना एकत्रित करून जनजागृतीची शिकवण देऊन तेव्हापासून गणेशोत्सव साजरा करण्यात येऊ लागला. त्याप्रमाणेच समता नागरी सहकारी पतसंस्थेत देखील गणेशोत्सव साजरा केला जातो.
संस्थेच्या प्रत्येक शाखेत श्री गणेशाची विधीवत पूजा करून स्थापना केली आहे आणि संस्थेचे सभासद, ठेवीदार, कर्जदार, हितचिंतक आदींना शाखेत बोलावून त्यांच्या हस्ते पूजा करून आरती करण्याचा मान दिला जातो. आरतीसाठी आलेले सभासद, ठेवीदार, कर्जदार, हितचिंतक, जेष्ट कर्मचारी यांना संस्थेच्या योजना, सामाजिक उपक्रमांची माहिती, आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती होते. आज ११ सप्टेंबर रोजी प्रत्येक शाखेत सभासद व कर्मचाऱ्यांच्या हस्ते गणेशाची आरती करून मान दिल्याची माहिती संस्थेचे संचालक श्री संदीप कोयटे यांनी दिली.
आज कोपरगाव शाखेत कर्मचारी नितीन राऊत यांनी सकाळी तर संध्याकाळी मंगेश गायकवाड यांनी आरती केली.येवला शाखेत सकाळी आरतीचा मान श्री व सौ पेटकर तर संध्याकाळी श्री व सौ अनावडे यांना दिला. ठेवीदार श्री गणेश अरिंगळे यांना नाशिक शाखेतील श्रींची सकाळी तर सायंकाळी खातेदार सौ वैशाली व श्री राजेंद्र सगर यांना आरती चा मान दिला.राहुरी शाखेत खातेदार येवले,नांदेड शाखेत ठेवीदार श्री जयस्वाल, शिर्डी शाखेत खातेदार श्री विलास गाढवे, वैजापूर शाखेत श्री सचिन खंडागळे यांच्या हस्ते आरती करण्याचा मान देण्यात आला.श्रीरामपूर, अहमदनगर या शाखेतही श्रींची आरती करण्यात आली.