स्वामी विवेकानंद नागरी सहकारी पतसंस्थेची समताच्या मुख्य कार्यालयास सदिच्छा भेट
समता वार्ता कार्यकारी संपादक पोपट साळवे

स्वामी विवेकानंद नागरी सहकारी पतसंस्थेची समताच्या मुख्य कार्यालयास सदिच्छा भेट
कोपरगाव– कोणतीही संस्था ही व्यक्ती केंद्रीत नसून ग्राहक, सभासद यांना देणाऱ्या त्वरित सेवेवर अवलंबून असते. त्यामुळे समता नागरी सहकारी पतसंस्था ही काकांच्या मार्गदर्शनाखाली आधुनिक तंत्रज्ञान, लिक्विडीटी बेस प्रोटेक्शन फंडामुळे ठेवीदारांच्या ठेवींना सुरक्षितता प्रदान केली असल्यामुळे समता ही महाराष्ट्रातील पतसंस्थांपैकी विश्वास पात्र पतसंस्था म्हणुन ओळखली जाते. असे गौरोद्गार जालना येथील स्वामी विवेकानंद नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक श्री.बाळासाहेब कुलकर्णी यांनी काढले.
समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयास जालना येथील स्वामी विवेकानंद नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक सर्वश्री.बाळासाहेब कुलकर्णी, शाखाधिकारी कौस्तुभ संगमुळे, विवेक देशपांडे, मनोज दरबस्तवार, सुनिल आंबेकर, सौ.सपना जनसारी, महेश देव, सुशिल देशपांडे, ऋषिकेश कराळे, मुख्य कार्यालयाच्या वसुली अधिकारी सौ.दिव्या भुतडा, शैलेश धोत्रे, राहुल अडीयाल आदींनी १७ सप्टेंबर २०२१ रोजी सदिच्छा भेट दिली.प्रसंगी बोलत होते.
प्रसंगी संस्थेतील फॉरेन्सिक ऑडीट कंट्रोल रूम, व्हाऊचरलेस बँकिंग, पेपरलेस बँकिंग, मोबाईल बँकिंग क्यु.आर.कोड, शुअर सेल-शुअर पेमेंट योजना, लिक्विडीटी बेस प्रोटेक्शन फंड, सोनेतारण विभाग, ऑनलाईन समता रिकव्हरी पॅटर्न आदींविषयी संस्थेचे संचालक श्री.संदीप कोयटे, जनरल मॅनेजर श्री.सचिन भट्टड यांच्याशी सविस्तर चर्चा करून प्रत्यक्षात मुख्य कार्यालयातील विविध विभागांची माहिती एच.आर. श्रीमती उज्वला बोरावके, ई.डी.पी. प्रमुख योगेश आसने, वसुली प्रमुख जनार्दन कदम, कोपरगाव शाखेचे शाखाधिकारी आप्पासाहेब कोल्हे यांनी दिली.
समता पतसंस्थेच्या भेटीप्रसंगी समताचे पदाधिकारी, अधिकारी आदींनी दिलेली अनमोल माहिती व बहुमोल वेळ दिल्याबद्दल स्वामी विवेकानंद नागरी सहकारी पतसंस्थेचे शाखाधिकारी श्री.कौस्तुभ संगमुळे यांनी आभार व्यक्त करत समताच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.