ब्रेकिंगमहाराष्ट्र

समता इंटरनॅशनल स्कूलच्या गणरायाला उत्साहात निरोप

समता वार्ता कार्यकारी संपादक पोपट साळवे

समता इंटरनॅशनल स्कूलच्या गणरायाला उत्साहात निरोप

 कोपरगाव– समता इंटरनॅशनल स्कूल विद्यार्थी केंद्रीत शारीरिक व मानसिकदृष्ट्या प्रगल्भता प्राप्त करण्याच्या उद्देशाने विविध उपक्रम राबवित असते. त्या अनुषंगाने महाराष्ट्राला परिचित असलेली समता ही शैक्षणिक संस्था होय. समता  इंटरनॅशनल स्कूलमध्ये गणेश चतुर्थीच्या दिवशी गणरायाचे आगमन मोठ्या उत्साहात करण्यात आले होते. गणरायाचे आगमन हा उपक्रम देखील विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा असून त्याला धार्मिक, सामाजिक दृष्ट्या अनन्यसाधारण महत्व आहे. यातूनच लोकमान्य टिळकांचा गणेशोत्सव सुरु करण्यामागील मुख्य भूमिका देखील विद्यार्थ्यांना समजण्यास मदत होत असते. गणरायाच्या आगमना नंतर अनंत चतुर्थीच्या दिवशी विधीवत महापूजा करून समताच्या गणरायाला विद्यार्थ्यांसोबत शिक्षकांनीही सहभागी होऊन उत्साहात निरोप दिल्याची माहिती समता इंटरनॅशनल स्कूलच्या मॅनेजिंग ट्रस्टी सौ.स्वाती कोयटे यांनी दिली.

प्रसंगी भारतीय संस्कृती व परंपरा जपत ‘मराठी आमची बोली भाषा संस्कृती आमची ढोल ताशा’ या अनुषंगाने आणि ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ च्या जयघोषात समता स्कूलच्या प्राथमिक, माध्यमिक  विभागातील विद्यार्थी आणि शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आदींनी गणेशोत्सवात सहभागी होत समता स्कूलची प्रसिद्ध असलेली ढोल ताशा ही कला जोपासली.

यावेळी स्कूल मधील सर्व शिक्षक, शिक्षिका व कर्मचाऱ्यांनी पारंपारिक पोशाख परिधान करून ढोल ताशा वाजवत भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविले. शिक्षक शिक्षिकांनी मुलांसोबत विविध गणपतीच्या गीतावर नृत्य सादर केली. शिक्षक श्री.आकाश मिश्रा यांनी गणरायाची महती सांगत शिवरायांच्या इतिहासाला उजाळा देत त्यांच्या नावाने गजर केला. तर इतर शिक्षकांनी हातात भगवा ध्वज घेऊन ढोलाच्या तालावर ताशाच्या काडीने, झांजाच्या वेडाने, टोलच्या धडाडीने, अन ध्वजाच्या भरारीने या आधुनिक युगात मराठी संस्कृती व परंपरा जपण्याचा प्रयत्न केला आहे.

समता स्कूलचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे, शालेय पोषण समितीच्या अध्यक्षा सौ.सुहासिनीताई कोयटे यांनी प्रोत्साहनपर शुभेच्छा दिल्या. तर समता स्कूलच्या मॅनेजिंग ट्रस्टी सौ.स्वाती कोयटे,मुख्य कार्यवाह श्री.संदीप कोयटे,  शैक्षणिक संचालिका सौ.लिसा बर्धन, उपप्राचार्य श्री.समीर अत्तार व व्यवस्थापन समिती सदस्य गणरायाच्या विसर्जन प्रसंगात उत्साहाने सहभागी होत विद्यार्थी, शिक्षकांसोबत आनंद घेतला.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे