व्यापारी महासंघाच्या मदतीने कोपरगाव शहरातील गुन्हेगारी नियंत्रणात – श्री संजय सातव,उपविभागीय पोलिस अधिक्षक
कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे
व्यापारी महासंघाच्या मदतीने कोपरगाव शहरातील गुन्हेगारी नियंत्रणात – श्री संजय सातव,उपविभागीय पोलिस अधिक्षक
कोपरगाव : कोपरगाव तालुका व्यापारी महासंघ ही संघटना व्यापाऱ्यांसोबत जनसामान्य नागरिकांचा विचार करणारी संघटना असून शहरातील व्यापाऱ्यांच्या समस्याविरोधात लढत असते त्या बरोबरच सामाजिक,सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रात ही हिरीरीने भाग घेत असते.मागील काही महिन्यांपासून कोपरगाव शहरात सी सी टी.व्ही.कॅमेरे बसविले होते त्याचा फायदा व्यापाऱ्यांना झाला त्याबरोबरच पोलिस यंत्रणेला ही झाला.व्यापारी महासंघाच्या या उपक्रमामुळे कोपरगाव शहरातील गुन्हेगारी नियंत्रणात आली असल्याची माहिती शिर्डी उपविभागीय पोलिस अधीक्षक श्री संजय सातव यांनी दिली.
कोपरगाव शहर पोलिस स्टेशन साठी बांधण्यात आलेल्या नूतन इमारतीचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले.कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे नूतन इमारतीत स्थलांतर झाले.त्यांचा सत्कार करण्यासाठी व्यापारी महासंघाचे पदाधिकारी गेले असता ते बोलत होते.प्रसंगी शिर्डी उपविभागीय पोलिस अधीक्षक श्री संजय सातव यांचा सत्कार कोपरगाव तालुका व्यापारी महासंघाचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांनी केला तर कोपरगाव शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक श्री वासुदेव देसले यांचा सत्कार व्यापारी महासंघाचे कार्याध्यक्ष श्री सुधीर डागा,खजिनदार श्री तुलसीदास खुबानी,धारणगाव रोड शाखाध्यक्ष श्री गुलशन होडे यांनी संयुकपणे केला.
व्यापारी महासंघाचे अध्यक्ष मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, काका कोयटे म्हणाले की,आम्ही कोपरगाव शहारातील व्यापाऱ्यांच्या दृष्टीने सतत प्रयत्नशील असून त्यांच्या सुरक्षेसाठी कॅमेरे बसविले होते त्यामुळे अनेक व्यापारी सुरक्षित आहे.संपूर्ण कोपरगाव शहराच्या दृष्टीने व्यापारी महासंघ कोपरगाव शहरात अजून कॅमेरे बसून देण्यासाठी तयार आहे.फक्त पोलीस नियंत्रण कक्षाने बसविलेल्या सर्व कॅमेऱ्यांचे नियंत्रण स्वतःकडे ठेवावे.अशी इच्छा व्यक्त केली.
प्रसंगी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष काका कोयटे,व्यापारी महासंघाचे संचालक श्री नारायण अग्रवाल,कार्याध्यक्ष श्री सुधीर डागा,खजिनदार श्री तुलसीदास खुबानी,धारणगाव रोड शाखाध्यक्ष श्री गुलशन होडे व पदाधिकारी उपस्थित होते.