ब्रेकिंगमहाराष्ट्र

कोपरगाव तालुका व्यापारी महासंघ आणि किराणा मर्चंट असोसिएशनच्या वतीने आमदार आशुतोष काळे यांचा नागरी सत्कार

समता वार्ता कार्यकारी संपादक पोपट साळवे

कोपरगाव तालुका व्यापारी महासंघ आणि किराणा मर्चंट असोसिएशनच्या वतीने आमदार आशुतोष काळे यांचा नागरी सत्कार

कोपरगाव : जगप्रसिद्ध साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डीच्या अध्यक्ष पदी निवड आणि कोपरगाव शहरातील पूरग्रस्त व्यापाऱ्यांना राज्यसरकारच्यावतीने सरकारी मदत मिळवून दिल्याबद्दल कोपरगाव तालुका व्यापारी महासंघ आणि कोपरगाव तालुका किराणा मर्चंट असोसिएशनचे वतीने २४ ऑक्टोबर २०२१ रोजी समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या स्व यशवंतराव चव्हाण समता सहकार सभागृहात व्यापारी महासंघाचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे आणि किराणा मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष राजकुमारजी बंब यांच्या हस्ते नागरी सत्कार करण्यात आला.प्रसंगी कोपरगाव शहरात व्यापाऱ्यांच्या विविध समस्या व त्यावर प्रशासनाकडून असलेल्या अपेक्षा या संदर्भात व्यापारी महासंघ,किराणा मर्चंट असोसिएशन, विविध व्यापारी संघटना आणि आमदार आशुतोष काळे, उपस्थित कोपरगाव नगरपालिकेचे नगरसेवक यांच्यात विचार विनिमय बैठक पार पडली.नागरी सत्कार सोहळा आणि विचार विनिमय बैठकीचे अध्यक्ष व्यापारी महासंघाचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे होते.
नागरी सत्काराला उत्तर देताना कोपरगाव तालुक्याचे आमदार आशुतोष काळे म्हणाले की, कोरोना महामारीमुळे कोपरगाव शहरातील व्यापारी वर्ग अडचणीत आला असून ग्राहक संरक्षण कायद्याच्या अनुषंगाने व्यापाऱ्यांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करणार असून समृद्धी महामार्गाचे काम राज्य सरकार कडून लवकरात लवकर करून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. कोपरगाव शहरातील अनेक कामांसाठी १२ कोटी निधी आजपर्यंत मिळवून दिला असून नगरपालिकेच्या माध्यमातून शहरातील छोटया-मोठ्या व्यापाऱ्यांच्या मूलभूत समस्या सोडवून शहारासाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून कोपरगावच्या व्यापाऱ्यांना शिर्डीसह आजूबाजूच्या तालुक्यातही व्यापार कसा करता येईल याचा विचार करणार आहे.अध्यक्षीय मनोगतातून काका कोयटे म्हणाले की,कोपरगाव तालुक्याचे आमदार आशुतोष काळे हे महाराष्ट्रातील आमदारांमध्ये विकासाच्या बाबतीत पहिल्या १० मध्ये असून त्याचे कार्य कर्तृत्वामुळे शिर्डी विश्वस्त व्यवस्थेचे अध्यक्ष पद मिळाल्यामुळे त्यांना चांगली संधी मिळाली असून नवीन ओळख निर्माण करण्याची संधी प्राप्त झाली आहे.तसेच व्यापारी महासंघाचे छोटे-मोठे व्यापारी हे स्वतःच्या खिशाला कात्री लागली तरी सामाजिक दायित्व सोडत नाही.त्यामुळे कोपरगाव तालुक्याचा विकास करताना कोपरगावची बाजारपेठ ओस पडू नये यासाठी शहरातील व्यापाऱ्यांच्या मूलभूत समस्यांकडे लक्ष देऊन त्या सोडवाव्यात. विशेषतः शहरातील रस्ते, स्वच्छ पाणी यांसह भाजी मार्केट प्रमाणे फळांचे मार्केट, ग्रामीण भागातून शहरात येणाऱ्या ग्राहकांसाठी पार्किंग व्यवस्था आणि समृध्दी महामार्ग कोपरगाव जवळून जात असल्याने मुंबई कोपरगावच्या जवळ येत आहे.कोपरगावचा व्यापारी मुंबईला अडीच-तीन तासात पोहचू शकतो याचा फायदा कोपरगावच्या व्यापाऱ्यांना कसा करून देत येईल यासाठी प्रयत्न करावा त्यासाठी संबधित खात्याच्या अधिकाऱ्यांशी आमदारांनी बैठक आयोजित करावी.आमच्या समस्या सोडवून ग्रामीण भागातील ग्राहकाची नाळ शहराशी जोडण्याचा प्रयत्न करावा.सदर सत्कार समारंभा प्रसंगी किराणा मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष राजकुमार बंब यांनी स्वागतपर प्रास्ताविक करत कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला तर व्यापारी महासंघाचे जेष्ठ पदाधिकारी अजित लोहाडे, कार्याध्यक्ष सुधीर डागा आणि माजी जिल्हा परिषद सदस्य केशवजी भवर यांनी मनोगत व्यक्त करत शहरातील व्यापाऱ्यांना व्यापार करताना येणाऱ्या प्रमुख अडी-अडचणी व्यक्त करत त्या सोडविण्याची विनंती केली.व्यापारी महासंघाने अनेक सामाजिक उपक्रम राबवून कोपरगावकरांची सेवा करत आहे त्यामध्ये कोरोना काळात गरजू,अनाथांना मोफत डबे वाटप, हँडवॉश वाटप, कोकणात आलेल्या महापुरातील पूरग्रस्तांना किराणा किटचे वाटप यांसारखे सामाजिक उपक्रम विशेष उल्लेखनीय आहे.कोपरगाव तालुका व्यापारी महासंघाचे जेष्ठ पदाधिकारी अजितशेठ लोहाडे, तुलसीदास खुबानी,बाळासाहेब कुर्लेकर, केशव भवर,गुलशन होडे,दीपक अग्रवाल, किरण शिरोडे,व्यापारी महासंघ महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ किरण दगडे, महिला आघाडीच्या इतर महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.सोहळा यशस्वीतेसाठी व्यापारी महासंघाचे कार्याध्यक्ष सुधीर डागा,सचिव प्रदीप साखरे यांच्या मार्गदर्शनाखाली व्यापारी महासंघ आणि किराणा मर्चंट असोसिएशनचे पदाधिकारी,सदस्य यांनी विशेष परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आणि उपस्थितांचे आभार व्यापारी महासंघाचे सचिव प्रदीप साखरे यांनी मानले.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे