समताच्या सहकार उद्योग मंदिराच्या वतीने महिलांसाठी प्रगतीचा मंत्र
समता वार्ता कार्यकारी संपादक पोपट साळवे
समताच्या सहकार उद्योग मंदिराच्या वतीने महिलांसाठी प्रगतीचा मंत्र
कोपरगाव : संपूर्ण महाराष्ट्रातील शहरी व ग्रामीण भागातील महिला सबलीकरण आणि सक्षमीकरण योजनेंतर्गत समता महिला बचत गट आणि महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन आणि सहकार उद्योग मंदिराच्यावतीने महिलांसाठी प्रगतीचा मंत्र या उपक्रमांतर्गत संपूर्ण महाराष्ट्रातील महिला व मुलींनी टेलरिंग कोर्स केला,
पण.. परफेक्ट मास्टर कटिंग येत नाही त्यांच्यासाठी मोनाली फॅशन डिझायनिंग (एम.एफ.डी. स्केल ) द्वारे मोफत पंजाबी ड्रेस व ब्लाउज कटिंगचे दोन दिवसीय प्रशिक्षणाकरिता ३५ वर्षाचा अनुभव असणारे तज्ज्ञ प्रशिक्षक श्री शंकर बोरणारे, नाशिक येथील फॅशन डिझायनर सौ मोनाली महाले,कु. शिवनाथ शंकर बोरणारे आदींचे मार्गदर्शन लाभणार आहे.
महाराष्ट्रात या सामाजिक उपक्रमाचे नियोजन केले आहे. महाराष्ट्रातील ज्या सेवाभावी संस्था,समाजसेवक, समाजसेविका यांना या सामाजिक उपक्रमाद्वारे सामाजिक दायित्वाची भूमिका पार पाडायची असेल त्यांनी ९४०४०१४१४८,९१५८२७६६८५ या क्रमांकाशी संपर्क साधावा.