माजी सैनिकांचा सन्मान करत समताने त्यांच्या ठेवींना आकर्षक व्याजदर देण्याचे केले जाहीर – काका कोयटे
समता वार्ता कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे
माजी सैनिकांचा सन्मान करत समताने त्यांच्या ठेवींना आकर्षक व्याजदर देण्याचे केले जाहीर – काका कोयटे
कोपरगाव : भारतीय सैनिक हा प्रामाणिकपणे देश सेवा करून देशातील सर्वच जनतेचे संरक्षण करून समाजातील प्रत्येकाला शत्रूपासून सुरक्षा देत असतो त्यामुळे १५ जानेवारी हा दिवस भारतीय सेना दिवस (इंडियन आर्मी डे)साजरा करून भारतीय सैनिकांचा सन्मान केला जातो याच दिवसाचे औचित्य साधून समता नागरी सहकारी पतसंस्थेने ही कोपरगाव तालुका एक्स सर्व्हिसमॅन असोसिएशन च्या माजी सैनिकांचा सन्मान करून त्यांच्या ठेवींना अर्धा टक्का व्याजदर जाहीर केले आहे. ही योजना २६ जानेवारी २०२२ नंतर भारतातील सर्वच माजी सैनिकांना २७ जानेवारी २०२२ पासून समताच्या प्रत्येक शाखेत अंमलात येणार असल्याची माहिती समता पतसंस्थेचे चेअरमन ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांनी दिली.
भारतात १५ जानेवारी हा दिवस इंडियन आर्मी डे म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचे औचित्य साधून समता पतसंस्थेच्या वतीने कोपरगाव तालुका एक्स सर्व्हिसमॅन असोसिएशन चे अध्यक्ष श्री युवराज गांगवे,उपाध्यक्ष श्री मारुती कोपरे,सदस्य सर्व श्री बाळासाहेब वाघ,मधुकर इनामके, पंकज झावरे,रामनाथ वर्पे आदींचा समता पतसंस्थेचे चेअरमन ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांच्या हस्ते समता महिला बचत गटाच्या महिलांनी कलाकुसर करत अगरबत्ती व कापूर एकत्र बांधून तयार केलेला गुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.प्रसंगी ते बोलत होते.
तसेच ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत समता गेली असून त्यांना विश्वास आणि सुरक्षितता प्रदान करत आहे. समता पतसंस्था महाराष्ट्रातील सर्वसामान्य व्यक्तीपासून ते प्रथम श्रेणी अधिकाऱ्यांपर्यंत समताच्या वेगवेगळ्या योजना,उपक्रम आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून घेऊन जात आहे.त्या योजना उपक्रमांचा ग्राहक, सभासदाला फायदेशीर कशा ठरतील या दृष्टीने देखील समताचा प्रत्येक कर्मचारी सभासदांना सेवा देत असतो.
प्रसंगी मनोगत व्यक्त करताना अध्यक्ष श्री युवराज गांगवे म्हणाले की, आम्ही सेवानिवृत्त होईपर्यंत भारत देशाचे संरक्षण करत असतो अनेक जवानांना देशासाठी शाहिद ही व्हावे लागते पण सेवानिवृत्तीनंतर नंतर अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. वेगवेगळ्या समस्यांचा विचार करून समता पतसंस्थेने आम्हा भारतातील सेवा निवृत्त सैनिकांना आजच्या दिवशी ठेवींवर अर्धा टक्का आकर्षक व्याजदर जाहीर करून या दिवसाची भेटच दिली आहे.माजी सैनिकांना आकर्षक व्याजदर देणारी सहकारातील समता पतसंस्था ही पहिलीच पतसंस्था आहे. कार्यक्रमाचे सुत्रसंचाल मुख्य कार्यालयाचे एच.आर.श्रीमती उज्वला बोरावके यांनी केले.जनरल मॅनेजर श्री सचिन भट्टड,मुख्य कार्यालयाचे अधिकारी, कोपरगाव शाखेचे शाखाधिकारी श्री आप्पा कोल्हे आणि कर्मचारी,हितचिंतक उपस्थित होते.उपस्थितांचे आभार शाखाधिकारी श्री आप्पा कोल्हे यांनी मानले.