ब्रेकिंगमहाराष्ट्र

ग्राहकांच्या सेवेसाठी नांदेड शहरात समता पतसंस्थेच्या दोन सोनेतारण विस्तारित कक्षाचे उद्घाटन

समता वार्ता कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे

ग्राहकांच्या सेवेसाठी नांदेड शहरात समता पतसंस्थेच्या दोन सोनेतारण विस्तारित कक्षाचे उद्घाटन

कोपरगाव : समता नागरी सहकारी पतसंस्था १२०० कोटी रुपयांचा व्यवसाय करणारी महाराष्ट्रातील अग्रगण्य पतसंस्था असून नुकताच सोनेतारण कर्जाचा १५० कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे.त्यामुळे समता अधिक सुस्थितीत पोहचली असून महाराष्ट्रातील सर्वच ग्राहक,सभासदांना सेवा देत आहे.ग्राहकांना व्यवहारासाठी एक हक्काची पतसंस्था म्हणून नावारूपाला येत असून श्री गणेश जयंतीच्या शुभ मुहूर्तावर नांदेड शहरातील भावसार चौक व सराफा बाजार या ठिकाणी सोनेतारण कक्षाचे उद्घाटन नांदेड शहरातील प्रतिष्ठित व्यापारी श्री बिपीनजी कासलीवाल यांच्या शुभहस्ते करण्यात आल्याची माहिती समता नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक श्री संदीप ओमप्रकाश कोयटे यांनी दिली.

प्रसंगी उद्घाटनपर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री बिपीनजी कासलीवाल यांचे स्वागत आणि सत्कार संस्थेचे संचालक श्री संदीप कोयटे यांनी केला.

मनोगत व्यक्त करताना श्री बिपीन कासलीवाल म्हणाले की, समता पतसंस्थेचे सोनेतारण कर्ज छोटे-मोठे व्यापारी, नोकरदार आणि शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त व स्वस्त असून त्वरीत उपलब्ध होणारे आहे.त्यामुळे समताच्या या सुविधेचा नांदेड शहाराबरोबरच जिल्ह्यातील ग्राहकांना फायदा होणार आहे तसेच सर्वसामान्य नागरिक,शेतकरी तसेच इतर क्षेत्रातील गरजवंत यांची मोठी सोय होणार आहे. या सोनेतारण कर्जा प्रमाणेच समताच्या योजना आणि नवनवीन उपक्रम ग्राहक,सभासद हिताचे आहेत.

समता पतसंस्थेचे चेअरमन ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे व संचालक मंडळाने या उद्घाटनपर कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या तर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे नांदेडचे प्रतिष्ठित उद्योजक श्री विपीन कासलीवाल,संस्थेचे संचालक श्री.संदीप कोयटे,सेवानिवृत्त कृषीअधिकारी श्री शिवराज मुगावे, महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे सेवानिवृत्त शाखाधिकारी श्री बालाजी कापूसकरी,श्री महारुद्र भवानकर, गोदावरी मल्टीस्टेट अर्बन बँकेचे शाखाव्यवस्थापक श्री अविनाश बोचरे,श्री.संतोष पटने,श्री राजन मिसाळे, बुलढाणा अर्बन तरोडा शाखेचे शाखा व्यवस्थापक श्री उदय चौधरी, एल.आय.सी चे वरिष्ठ अधिकारी श्री संतोष मारमपल्ले, प्रसिद्ध व्यापारी श्री वीरभद्र बरगळ. श्री शिवलिंग स्वामी आदींसह हितचिंतक,ग्राहक,सभासद उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आणि उपस्थितांचे आभार श्री केदार नागठाणे यांनी मानले.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे