समता सभासदांशी आपुलकी जपते – गुलाबराव नेहरकर, अध्यक्ष (जय हिंद पतसंस्था, नारायण गाव)
कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे
समता सभासदांशी आपुलकी जपते – गुलाबराव नेहरकर, अध्यक्ष (जय हिंद पतसंस्था, नारायण गाव)
कोपरगाव : महाराष्ट्रातील सहकारी पतसंस्था चळवळीत समता नागरी सहकारी पतसंस्थेचे योगदान उल्लेखनीय आहे. संस्थेत वापरत असलेले अत्याधुनिक तंत्रज्ञान, विविध योजना, उपक्रम हे पतसंस्थांना दिशादर्शक आहे. तसेच समताने सभासदांशी विविध उपक्रमांमधून आपुलकी जपली असून त्या द्वारा विश्वास संपादन केला आहे. संस्थेच्या प्रगतीत संस्था व सभासद यात असणारी आपुलकी पाहायला मिळाली असल्याचे जय हिंद नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष गुलाबराव नेहरकर यांनी सांगितले.
समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयास २९ डिसेंबर २०२३ रोजी पुणे जिल्ह्यातील नारायणगाव येथील जय हिंद नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष गुलाबराव नेहरकर, उपाध्यक्ष विजय गुंजाळ, संचालक अजित नेहरकर, व्यवस्थापक विक्रम भुजबळ, लिपिक आनंद शिंदे आदींनी सदिच्छा भेट दिली.
समता पतसंस्थेच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मोबाईल बँकिंग, सेल्फ बँकिंग, व्हाऊचरलेस बँकिंग, क्यु.आर.कोड, फॉरेन्सिक ऑडीट कंट्रोल रूम, समता रिकव्हरी पॅटर्न, सोनेतारण विभाग ही पतसंस्था चळवळीला दिशादर्शक असणारी अत्याधुनिक प्रणाली विषयी संस्थेचे चेअरमन ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांच्याशी सविस्तर चर्चा करून संचालक संदीप कोयटे, जनरल मॅनेजर सचिन भट्टड, ठेव विभागाचे संजय पारखे यांनी सविस्तर माहिती दिली.
समता नागरी सहकारी पतसंस्थेविषयी मिळालेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल जय हिंद नागरिक सहकारी पतसंस्थेच्या पदाधिकारी अधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त करत आभार मानले आणि पुढील आर्थिक प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या.