ब्रेकिंगमहाराष्ट्र

महाराष्ट्रातील पतसंस्था चळवळीला समता पतसंस्थेच्या योगदानामुळे बळकटी – खासदार डॉ.सुजय विखे

कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे

महाराष्ट्रातील पतसंस्था चळवळीला समता पतसंस्थेच्या योगदानामुळे बळकटी – खासदार डॉ.सुजय विखे

कोपरगाव– महाराष्ट्रातील पतसंस्था चळवळीत समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या योगदानामुळे बळकटी मिळाली आहे. समता पतसंस्थेचे चेअरमन ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे हे महाराष्ट्रातील सर्व पतसंस्था या आपल्या पतसंस्थेच्या शाखा आहेत असे समजून पतसंस्था चळवळीत कार्य करीत असल्याचे गौरवोद्गार खासदार डॉ.सुजय विखे यांनी समता पतसंस्थेच्या अहमदनगर शहरातील सावेडी भागातील प्रेमदान चौकात दुसऱ्या शाखेच्या उद्घाटना प्रसंगी काढले.

खासदार डॉ.सुजय विखे पुढे म्हणाले कि. ज्या पतसंस्था अडचणीत आल्यामुळे ठेवीदारांच्या ठेवी परत मिळत नाही त्या पतसंस्थांवर फौजदारी कायद्यान्वये कठोर कारवाई गकेल्यास ठेवीदारांच्या ठेवी परत मिळु शकतील. त्या दृष्टीने कायद्यात बदल झाले पाहिजे. तसेच कोयटे परीवाराचे विखे परीवाराशी घट्ट नाते असल्याने मला या उद्घाटन समारंभासाठी यावेच लागले.

उद्घाटनपर कार्यक्रमाचे प्रास्ताविक समता पतसंस्थेचे चेअरमन काका कोयटे यांनी केले. प्रास्ताविकातून समता पतसंस्थेच्या कार्याचा आढावा देताना समताच्या ६६१ कोटी रुपयांच्या ठेवी,४७५ कोटी रुपयांचा कर्ज पुरवठा या कर्ज पुरवठ्यात १७५ कोटी रुपयांचे सोनेतारण कर्ज व १७५ कोटी रुपयांची गुंतवणूक या आधारे लिक्विडीटी बेस प्रोटेक्शन फंडाअंतर्गत समता पतसंस्थेच्या १२.५० लाख रुपयापर्यंतच्या ठेवी सुरक्षित झाल्या आहेत.या माध्यमांतून ९९.३५ टक्के ठेविदारांना संरक्षण देण्यास समता पतसंस्था यशस्वी झाली आहे. तसेच सहकारी पतसंस्थांमधील ठेवींचा उपयोग रोजगार व व्यवसाय निर्मिती साठी होत असल्याने नागरिकांनी आपल्या ठेवी सहकारी पतसंस्थांमध्येच ठेवाव्यात.

समता पतसंस्थेच्या सावेडी परिसरातील शाखेचे उद्घाटन खासदार डॉ.सुजय विखे यांचे हस्ते करण्यात आले तर उद्घाटनपर कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान आमदार संग्राम जगताप यांनी भूषविले.अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना आमदार संग्राम जगताप म्हणाले कि, समता पतसंस्थेने आपल्या कामाच्या माध्यमातून स्वतःची एक ब्रँड व्हॅल्यू तयार केली आहे. विशेषतः समता पतसंस्थेचे चेअरमन यांनी वयाची ७० वी देखील ओलांडली असून महाराष्ट्रातील पतसंस्था बळकटीसाठी रात्रंदिवस हजारो किलोमीटर चा प्रवास करत असतात. त्यांचे कार्य आजच्या तरुण पिढीला लाजवेल असे आहे.तसेच महाराष्ट्रातील पतसंस्था चळवळीविषयी निर्माण होणाऱ्या अनेक अडचणी संदर्भात महाराष्ट्र शासनाकडे त्यांच्या वतीने दाद मागवून अडचणी सोडविण्याचा प्रयत्न करीन.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांनी समता पतसंस्थेच्या अत्याधुनिक सुविधांबद्दल गौरोद्गार काढले. समताच्या उत्कृष्ट कार्यशैलीमुळे समता पतसंस्था नावारूपाला आलेली आहे. त्यामुळे अहमदनगर जिल्ह्याचे नावही उंचावलेले असून ग्राहक सभासदांची सेवा करण्यातही अग्रक्रम मिळविणार आहे.

अहमदनगर जिल्हा स्थैर्यनिधीचे उपाध्यक्ष वसंत लोढा म्हणाले कि, काका कोयटे यांचे नेतृत्वाखाली अहमदनगर जिल्हा स्थैर्यनिधी संघाचे काम महाराष्ट्रात नावारूपाला आलेले आहे. त्यामुळे पतसंस्था चळवळी वरील विश्वास दिवसेंदिवस वाढत आहे.

या कार्यक्रमास शुभेच्छा प्रसिद्ध बँकिंग तज्ञ आर.डी. मंत्री, व्यंकटेश मल्टी स्टेट चे अध्यक्ष अविनाश शिंदे, जेष्ठ कॉंग्रेस नेते डी.एम. कांबळे, कायनेटिक कंपनीचे जनरल मॅनेजर शशिकांत गुळवे जेष्ठ व्यापारी भालचंद्र क्षीरसागर, ट्रान्सपोर्ट व्यवसायिक शिवलिंग डोंगरे, टॅक्स कन्सल्टंट दत्तात्रय लोखंडे, प्रकाशजी हापसे आदि मान्यवरांनी उपस्थित राहून दिल्या.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे