श्री ओम सिद्धिविनायक मल्टीस्टेट आणि ए.पी.पाटील सर्वोदय ग्रामीण सहकारी पतसंस्थेच्या पदाधिकाऱ्यांची समताच्या मुख्य कार्यालयास सदिच्छा भेट
कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे

श्री ओम सिद्धिविनायक मल्टीस्टेट आणि ए.पी.पाटील सर्वोदय ग्रामीण सहकारी पतसंस्थेच्या पदाधिकाऱ्यांची समताच्या मुख्य कार्यालयास सदिच्छा भेट
श्री ओम सिद्धिविनायक मल्टीस्टेट को –ऑप.सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करताना संस्थेचे संचालक श्री. संदीप कोयटे.
ए.पी.पाटील सर्वोदय ग्रामीण सहकारी पतसंस्थेच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करताना ठेव विभाग प्रमुख श्री.संजय पारखे.
कोपरगाव : समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयास लातूर जिल्ह्यातील श्री ओम सिद्धिविनायक मल्टीस्टेट को-ऑप.सोसायटीचे सचिव श्री.शिवम श्रीशैल्य उटगे, श्री.सत्यम श्रीशैल्य उटगे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.माधव अंकुलगे, शाखाधिकारी श्री.राजकुमार तोळमारे आदी पदाधिकारी, अधिकाऱ्यांनी २६ सप्टेंबर २०२२ रोजी आणि

कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील हसुर येथील ए.पी. पाटील सर्वोदय ग्रामीण सहकारी पतसंस्थेचे संचालक श्री.विजय सत्याप्पा मानगावे, श्री.आप्पासाहेब शिवराम चौगुले, श्री.सुरेंद्र बाबुराव भंडे, असि.जनरल मॅनेजर श्री.अभिजीत बाबासाहेब पाटील, शाखाधिकारी श्री.संजय रावसाहेब पाटील, श्री.संतोष दादासाहेब खटावणे, श्री.विद्यासागर आदाप्पा माणगावे, श्री.रामगोंडा बाळगोंडा पाटील, श्री.भरत राजाराम मदभावे, श्री.महावीर कलगोंडा कागवाडे, श्री.भरतेस अप्पासाहेब गडदू, श्री.अरुण श्रीपाल पाटील, हेड क्लार्क श्री.नवनाथ मधुकर तोडकर, श्री.सचिन रमेश कोळेकर, क्लार्क श्रीी.धन्यकुमार रावसाहेब मुळेे, श्री.सुनील नेमिनाथ तकडेे, श्री. बाहुबली सुरेश पाटील आदी पदाधिकारी, अधिकाऱ्यांनी २४ सप्टेंबर २०२२ रोजी सदिच्छा भेट दिली.
प्रसंगी समता नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांच्याशी समता पतसंस्थेची सुसज्ज,भव्य इमारत,आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मोबाईल बँकिंग, व्हाऊचरलेस बँकिंग सुविधा, क्यु.आर.कोड, फॉरेन्सिक ऑडीट कंट्रोल रूम, समता रिकव्हरी पॅटर्न, सोनेतारण विभाग आणि

समता महिला बचत गटाच्या माध्यमातून तयार करण्यात येणारी अगरबत्ती, घी बत्ती, कापूर, हँडवॉश,उटणे, फुलवाती, समई वाती, अगरबत्ती आणि कापूर यांना एकत्र बांधून तयार करण्यात आलेला गुच्छ, मास्क, पेटीकोट आणि समताज सहकार मिनी मॉल मधील विक्रीसाठी उपलब्ध वस्तूंविषयी चर्चा केली. त्यानंतर संस्थेचे चेअरमन काका कोयटे,संचालक श्री संदीप कोयटे, ठेव विभाग प्रमुख श्री.संजय पारखे आणि समता महिला बचत गटाच्या महिलांनी यांनी सविस्तर माहिती दिली.

त्यानंतर समता पतसंस्थेचे संचालक श्री संदीप कोयटे यांच्या हस्ते श्री ओम सिद्धिविनायक मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांचा आणि ठेव विभाग प्रमुख श्री.संजय पारखे यांच्या हस्ते ए.पी.पाटील सर्वोदय ग्रामीण सहकारी पतसंस्थेच्या पदाधिकारी अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
समता पतसंस्था आणि सहकार उद्योग मंदिराविषयी मिळालेल्या माहितीबद्दल त्यांनी समाधान व्यक्त करत चेअरमन,संचालक मंडळ, अधिकाऱ्यांचे आभार मानले आणि समताच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देत निरोप घेतला.









