समता पतसंस्थेची आर्थिक स्थिती जाहीर
कोपरगाव : समता नागरी सहकारी पतसंस्थेची ३० सप्टेंबर २०२२ अखेरची म्हणजे ६ माहीची आर्थिक आकडेवारी जाहीर झाली आहे.त्यामध्ये समताच्या ७१८ कोटी रुपयांच्या ठेवींपैकी गत ६ महिन्यात ५८ कोटी रुपयांची वाढ झाली असून वार्षिक सरासरी मध्ये १७.५ टक्के इतकी वाढ झाली असल्याची माहिती समता पतसंस्थेचे जनरल मॅनेजर श्री.सचिन भट्टड यांनी दिली.
तसेच संस्थेचे असि.जनरल मॅनेजर आणि ठेव विभाग प्रमुख श्री.संजय पारखे अधिक माहिती देताना म्हणाले की, संस्थेचे एकूण कर्ज वाटप ५४७ कोटी रुपये एवढे आहे.एकूण कर्ज वाटपात सोनेतारण कर्ज २२७ कोटी रुपये आहे.त्याचे एकूण कर्ज वाटपाशी प्रमाण ४० टक्के इतके आहे. जगातल्या सर्वात सुरक्षित समजल्या जाणाऱ्या सोनेतारण कर्जाचे हे प्रमाण आहे.तसेच विविध बँकांमधील समताच्या २०८ कोटी रुपयांच्या ठेवी असून त्या ठेवींशी गुंतवणुकीचे प्रमाण २९ टक्के इतके झाले आहे हे वरील आकडेवारीवरून लक्षात येईल. संस्थेची गुंतवणूक, सुरक्षित सोनेतारण कर्ज, संस्थेची मालमत्ता यांचे ठेवींशी प्रमाण ७३ टक्के इतके आहे. समता पतसंस्थेच्या या उज्वल आर्थिक परिस्थितीमुळे समता लिक्विडिटी बेस्ड प्रोटेक्शन स्कीम अंतर्गत समता पतसंस्थेच्या ९९.५५% इतक्या ठेवी सुरक्षित झाल्या आहेत.यामुळे संस्थेच्या ठेवीदारांच्या ठेवींना प्रत्येकी २० लाख रुपयापर्यंतची सुरक्षितता मिळाली आहे.
तसेच कोपरगाव शाखेचे शाखाधिकारी श्री.आप्पा कोल्हे म्हणाले की, दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी समताच्या वार्षिक सभेत अधिकाधिक डिव्हिडंट देण्यात येत असतो. या वर्षी झालेल्या वार्षिक सभेत संस्थेचे चेअरमन ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांनी सभासदांना १२ टक्के डीव्हीडंट देण्याचे जाहीर केले आहे.