तुळजापूर येथील तुळजाई पतसंस्थेच्या पदाधिकाऱ्यांची समताच्या मुख्य कार्यालयास सदिच्छा भेट
कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे
तुळजापूर येथील तुळजाई पतसंस्थेच्या पदाधिकाऱ्यांची समता च्या मुख्य कार्यालयास सदिच्छा भेट
कोपरगाव : समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयात १५ जून २०२२ रोजी उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील तुळजाई नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन श्री राजेंद्र देशमाने,संचालक श्री मकसुद शेख,श्री अमीर शेख,जनरल मॅनेजर श्री संजय ढवळे पदाधिकारी व अधिकारी यांनी सदिच्छा भेट दिली.
प्रसंगी समता नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांच्याशी समता पतसंस्थेचे आधुनिक तंत्रज्ञान, विविध योजना व उपक्रम,फॉंरेन्सिक ऑडीट कंट्रोल रूम, व्हाऊचर लेस बँकिंग सुविधा, क्यु.आर.कोड,समता रिकव्हरी पॅटर्न, सोने तारण विभाग आणि समता महिला बचत गटाच्या माध्यमातून तयार करण्यात येणारी अगरबत्ती , घी बत्ती , कापूर, हँडवॉश ,उटणे ,फुलवाती ,समईवाती ,मास्क ,पेटीकोट आणि समताज सहकार मिनी मॉल मधील विक्रीसाठी उपलब्ध उत्पादनांविषयी चर्चा करून संस्थेचे चेअरमन काका कोयटे, फॉरेन्सिक ऑडिट कंट्रोल रूम प्रमुख श्री संजय पारखे व कर्मचारी यांनी सविस्तर माहिती दिली.
नंतर उपस्थित पदाधिकाऱ्यांचा सत्कार संस्थेचे चेअरमन ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांच्या हस्ते समता महिला बचत गटाने अगरबत्ती व कापूर एकत्र बांधून तयार करण्यात आलेला गुच्छ देऊन करण्यात आला.
उपस्थित पदाधिकारी व अधिकारी यांना समता पतसंस्था, समता उद्योग मंदिर आणि समताज सहकार मिनी मॉल विषयी मिळालेल्या माहितीबद्दल समाधान व्यक्त करत समताचे अधिकारी, कर्मचारी यांनी दिलेली अनमोल माहिती व बहुमोल वेळ दिल्याबद्दल आभार मानले आणि समताच्या पुढील आर्थिक वाटचालीस शुभेच्छा देत निरोप घेतला.