ब्रेकिंगमहाराष्ट्र

कोपरगाव शहरात भव्य समता तिरंगा रॅलीचे आयोजन

कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे

कोपरगाव शहरात भव्य समता तिरंगा रॅलीचे आयोजन

कोपरगाव : दरवर्षी भारताचा स्वातंत्र्य दिन भारताचे पंतप्रधान दिल्ली येथे लाल किल्ल्यावर तिरंगा ध्वज फडकवून साजरा करतात.या वर्षी भारत देशात ७५ वा स्वातंत्र्य दिन स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव म्हणून मोठ्या संख्येने १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट दरम्यान मोठ्या उत्साहात देशातील प्रत्येक घरावर तिरंगा ध्वज फडकवून केंद्र शासनाचा हर घर तिरंगा हा उपक्रम साजरा केला जात आहे. कोपरगावये येथील निवाऱ्यातील काका कोयटे यांच्याकशिदा या लाल बंगल्या शेजारील स्व.दादाप्पा खंडाप्पा कोयटे विद्यालयाच्या ७५ फूट उंच भव्य तिरंगा ध्वजाचे ध्वजारोहण कोपरगाव तहसिलचे तहसिलदार श्री विजय बोरुडे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

तसेच कोपरगाव तालुक्यातही स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त समता परिवाराच्या वतीने ११११ फूट लांबीचा तिरंगा ध्वज बनवून कोपरगाव शहरातील गांधी पुतळ्यापासून ते निवाऱ्यातील स्व. दादाप्पा खंडाप्पा कोयटे विद्यालयापर्यंत समता तिरंगा रॅलीचे आयोजन १५ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी ठीक ९:४५ वा. करण्यात आले आहे. कोपरगाव तालुक्यातील माजी सैनिक व कोपरगाव तालुका एक्स सर्व्हिसमेन असोसिएशनचे अध्यक्ष श्री युवराज गांगवे यांच्या हस्ते तिरंगा रॅलीचा शुभारंभ होणार आहे. या तिरंगा रॅलीत कोपरगाव तालुक्यातील शाळा, महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी कोपरगाव तालुक्यातील व्यापारी, व्यावसायिक, उद्योजक तसेच तमाम कोपरगावकरांनी समता तिरंगा रॅलीला उपस्थित राहून या भव्य अशा रॅलीत सहभागी व्हावे.असे आवाहन समता नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक श्री संदीप कोयटे यांनी केले आहे.

या कार्यक्रमाला कोपरगाव शहर पोलीस निरीक्षक श्री वासुदेव देसले, कोपरगाव ग्रामीण पोलीस निरीक्षक श्री दौलतराव जाधव, कोपरगाव नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री शांताराम गोसावी, गट विकास अधिकारी श्री सचिन सूर्यवंशी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.विकास घोलप, तालुका कृषी अधिकारी श्री मनोज सोनवणे, सहाय्यक निबंधक श्री नामदेव ठोंबळ, गट शिक्षणाधिकारी श्रीमती शबाना शेख आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.सदर तिरंगा रॅलीचे आयोजन नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन काका कोयटे, कोपरगाव तालुका व्यापारी महासंघाचे कार्याध्यक्ष श्री सुधीर डागा, समता चॅरिटेबल ट्रस्टचे संचालक श्री संदीप कोयटे, कोपरगाव तालुका किराणा मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष श्री राजकुमार बंब, लायन्स क्लब ऑफ कोपरगाव चे अध्यक्ष श्री परेश उदावंत, समता इंटरनॅशनल स्कूलच्या मॅनेजिंग ट्रस्टी सौ.स्वाती कोयटे, कोपरगाव तालुका व्यापारी महासंघाचे सचिव श्री प्रदीप साखरे, कोपरगाव नगरपालिकेचे माजी नगरसेवक श्री जनार्दन कदम, लिओ क्लब ऑफ कोपरगाव चे अध्यक्ष श्री सुमित सिनगर यांच्या मार्गदर्शनाखाली या भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे