ब्रेकिंग

“समता इंटरनॅशनल स्कूलच्या प्रांगणात देशभक्तीची अनोखी उधळण”

कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे

समता इंटरनॅशनल स्कूलच्या प्रांगणात देशभक्तीची अनोखी उधळण

कोपरगाव : सहकार क्षेत्रात नेतृत्व व कर्तृत्वाने महाराष्ट्र राज्यातील सहकारी पतसंस्था चळवळ देशात, परदेशात पोहोचविणारे ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि विद्यार्थी हा केंद्रबिंदू या उद्देशाने स्थापन केलेल्या समता इंटरनॅशनल स्कूलमध्ये ७९ वा स्वातंत्र्यदिन उत्साहात आणि देशभक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला.

१५ ऑगस्टच्या पहाटेपासूनच शाळेच्या प्रांगणात आनंद आणि जोशाचे वातावरण पसरले होते. ध्वजारोहणाच्या पवित्र क्षणी ‘वंदे मातरम्’ आणि ‘भारत माता की जय’च्या घोषणांनी परिसर दुमदुमला. गगनभरारी घेत असलेल्या तिरंग्याने उपस्थितांच्या अंगावर रोमांच उभे केले. राष्ट्रगीताच्या गगनभेदी स्वरांनी कार्यक्रमाची सुरुवात झाली.

या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून शिर्डीतील उद्योजक श्री. धीरज समदाडीया व सौ. राखीताई समदाडीया, संस्थापक ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे, कार्यकारी विश्वस्त स्वाती कोयटे, प्राचार्य समीर अत्तार तसेच पालकवृंद उपस्थित होते. प्रमुख अतिथींचा परिचय प्राचार्य समीर अत्तार यांनी ओघवत्या शैलीत करून दिला. सान्वी शहाणे हिने सादर केलेले हृदयस्पर्शी बासरी वादन सर्वांना भावले.

विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत, नाटिका, नृत्याविष्कार तसेच प्रेरणादायी भाषणे सादर करून वातावरण भारावून टाकले. रणवीर मांजरे, तीर्थेश बाकलीवाल, इप्सिता राय, सर्वदा सिन्हा यांच्या प्रभावी भाषणांना टाळ्यांचा कडकडाट झाला. विविध स्पर्धांमध्ये विजेते ठरलेल्या विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली.

“स्वातंत्र्य म्हणजे लाखो बलिदानांचे फलित असून त्याचे जतन करणे हीच खरी देशसेवा आहे,” असे मार्गदर्शन प्रमुख पाहुणे धीरज समदाडीया यांनी केले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जिज्ञासा कुलकर्णी, हाशीम शाद, आर्या घोलप, किर्तीका वक्ते, साईश आभाळे यांनी केले. संगीत शिक्षक सागर भावसार, युनुस पटेल, नृत्य-नाट्यकला शिक्षक किरण लद्दे, आदित्य सुर्यवंशी, गार्गी पाटील, श्वेताली सदाफळ, शुभम औताडे, क्रीडा विभाग प्रमुख रोहित महाले तसेच कला विभाग प्रमुख विभावरी नगरकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

विशेष आकर्षण ठरले ते विभावरी नगरकर यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांनी रंगवलेल्या चित्रांचे. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने सजवलेल्या या चित्रांनी शाळेचा प्रत्येक कोपरा देशभक्तीच्या भावनेने उजळून निघाला.सर्व शिक्षक, विद्यार्थी व कर्मचारी यांच्या एकत्रित प्रयत्नांतून कार्यक्रम शिस्तबद्ध व यशस्वीरीत्या पार पडला. आभार प्रदर्शन जलिस शाद यांनी केले.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे