समता इंटरनॅशनल स्कूलमध्ये कला प्रदर्शन उत्साहात संपन्न
समता वार्ता कार्यकारी संपादक पोपट साळवे
समता इंटरनॅशनल स्कूलमध्ये कला प्रदर्शन उत्साहात संपन्न
कोपरगाव : समता इंटरनॅशनल स्कूल मध्ये कला प्रदर्शनाचे आयोजन करून योगाभ्यासाचे प्रसिद्ध प्रशिक्षक श्री दत्तात्रय पुंडे आणि सौ विमल दत्तात्रय पुंडे आणि प्रसिद्ध उद्योजक श्री सिद्धांत बागरेचा यांच्या प्रमुख उपस्थितीत समता स्कूलमधील ‘कला प्रदर्शन’ उत्साहात पार पडले.
कला प्रदर्शनाचे प्रमुख पाहुणे योगाभ्यासाचे प्रसिद्ध प्रशिक्षक श्री दत्तात्रय पुंडे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, कमी वयात विद्यार्थ्यांमधील कलाकुसर विकसित करण्यासाठी अशाप्रकारची प्रदर्शने भरविणे हे उत्कृष्ट माध्यम असून याद्वारे समता स्कूलने अतिशय स्तुत्य उपक्रम राबविला असून यामुळे विद्यार्थ्यांना दुसऱ्याप्रति काही तरी करण्याची, एक सामाजिक दायित्वाची ओळख होणार आहे तसेच विद्यार्थ्यांनी बनविलेल्या वस्तू अतिशय उत्कृष्ट असून कौतुकास्पद आहे.
प्रसंगी समता इंटरनॅशनल स्कूलच्या मॅनेजिंग ट्रस्टी सौ स्वाती संदीप कोयटे म्हणाल्या की, समता स्कूल नेहमीच विद्यार्थ्यासाठी विविध उपक्रम राबवून शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच सामाजिक, सांस्कृतिकतेचे महत्त्व समजावे यासाठी अग्रेसर असते. समता स्कूलच्या विद्यार्थ्यांनी दिवाळीसाठी आवश्यक असणारे आकाश कंदील, तोरणे, लटकन,विविध रंगाच्या रांगोळ्या आदी वस्तू तयार करून स्कूलतर्फे भरविण्यात आलेल्या कला प्रदर्शनात विक्रीसाठी उपलब्ध करून त्यातून मिळणारी रक्कम साई आश्रयातील अनाथ मुलांना देऊन त्याची दिवाळी आनंदमय करण्याच्या उद्देशाने आयोजन करण्यात आले होते.
प्रसंगी योगाभ्यासाचे प्रसिद्ध प्रशिक्षक श्री दत्तात्रय पुंडे आणि सौ विमल दत्तात्रय पुंडे आणि प्रसिद्ध उद्योजक श्री सिद्धांत बागरेचा यांचा परिचय आणि स्वागत शैक्षणिक संचालिका सौ लिसा बर्धन यांनी केले तर सत्कार सौ मॅनेजिंग ट्रस्टी सौ स्वाती कोयटे यांच्या हस्ते करण्यात आला. समता इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे, शाळा व्यवस्थापन समिती सर्व सदस्य, शालेय पोषण आहार समितीच्या अध्यक्षा सौ सुहासिनी कोयटे, मुख्य कार्यवाह श्री संदीप कोयटे, उद्योजक श्री सिद्धांत बागरेचा यांनी विद्यार्थी, त्यांना मार्गदर्शन केलेल्या सर्वच शिक्षकांचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.कला प्रदर्शनाचे सुत्रसंचालन आणि उपस्थितांचे आभार उपप्राचार्य श्री समीर अत्तार यांनी मानले.