समता पतसंस्थेच्यावतीने डिजिटल दानपेटीचा लोकार्पण सोहळा संपन्न
कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे
समता पतसंस्थेच्यावतीने डिजिटल दानपेटीचा लोकार्पण सोहळा संपन्न
कोपरगाव : कोपरगाव शहरातील निवारा परिसरात असलेल्या महादेव मंदिरात डिजिटल दानपेटी लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. महादेव मंदिराच्या कमिटीच्या वतीने कोपरगाव नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा सौ.सुहासिनी ओमप्रकाश कोयटे, निवारा भजनी मंडळाचे प्रमुख श्री.बाबासाहेब कापे, श्री. माऊली जनार्दन गायकवाड, श्री. वाकचौरे बाबा महाराज यांनी ही डिजिटल दानपेटी स्वीकारली.
धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सुरू करण्यात आलेल्या उपक्रमाबद्दल अधिक माहिती देताना समता पतसंस्थेचे असि.जनरल मॅनेजर आणि निवारा परिसराचे माजी नगरसेवक श्री.जनार्दन कदम म्हणाले की, डिजिटल दानपेटी देऊन समता नागरी सहकारी पतसंस्थेने डिजिटल क्रांतीत बाजी मारली आहे. या डिजिटल दानपेटीमुळे मंदिरातील दानपेटी चोरीस जाण्याचे प्रकार आता यापुढे घडणार नाही तसेच पूर्वी वापरात असलेली दानपेटी उघडल्यानंतर चिल्लर मोजण्यासाठीचा होणारा त्रास देखील होणार नाही तसेच भाविकांनी केलेले सर्व दान महादेव मंदिर कमिटीच्या नावाने समता पतसंस्थेत असलेल्या बचत खात्यात दररोज जमा होऊन या रकमेवर ७ टक्के व्याजही मिळणार आहे.
निवारा परिसरातील समता पतसंस्थेचे असि.जनरल मॅनेजर श्री. संतोष मुदबखे यांनी या डिजिटल दानपेटीचे महत्त्व आणि फायदे विशद केले. ते म्हणाले की, समता पतसंस्थेचे चेअरमन काका कोयटे यांच्या मार्गदर्शनाखाली अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात समता नागरी सहकारी पतसंस्था अग्रेसर असून समताने आधुनिक तंत्रज्ञानाच्या बाबतीत जागतिक पातळीवर देखील कीर्ती मिळविली आहे. जागतिक पातळीवरील डिजिटल दानपेटीचा पहिलाच प्रयोग समता पतसंस्थेच्या वतीने करण्यात येत आहे. या डिजिटल दानपेटीच्या अनुषंगाने सर्व भाविकांच्या डिजिटल दानास सुरक्षितता प्राप्त होणार आहे.
प्रसंगी निवारा भजनी मंडळाचे श्री. हौशी राम बर्गे, श्री. दिलीप संगमनेरे, श्री. प्रवीण कोल्हे, श्री.विजय कांगुने, जोशी गुरु तसेच निवारा महिला भजनी मंडळाच्या महिला, निवारा परिसरातील भाविक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.