ब्रेकिंगमहाराष्ट्र

समता स्कूलच्या मुलींच्या बास्केटबॉल संघाची विभागीय स्पर्धेसाठी निवड

कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे

समता स्कूलच्या मुलींच्या बास्केटबॉल संघाची विभागीय स्पर्धेसाठी निवड

विभागीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या समताच्या मुलींच्या बास्केटबॉल संघासमवेत समता इंटरनॅशनल स्कूलच्या मॅनेजिंग ट्रस्टी सौ. स्वाती कोयट, उप प्राचार्य श्री. समीर आत्तार व क्रीडा शिक्षक.

कोपरगाव : अहमदनगर जिल्हा क्रीडा विभागाच्यावतीने जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली १४ वर्ष वयोगटाखालील मुलींची जिल्हास्तरीय बास्केटबॉल स्पर्धा लोणी येथे घेण्यात आली होती. या स्पर्धेत समता इंटरनॅशनल स्कूलच्या मुलींच्या बास्केटबॉल संघाने प्रथम क्रमांक मिळविला असून १४ वर्ष वयोगटाखालील विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील मुलींच्या १२ संघांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. समताचा बास्केटबॉल संघ आणि आर्मी पब्लिक स्कूलचा संघ यांच्यात अंतिम लढत झाली त्यात समता स्कूलच्या बास्केटबॉल संघाने १०/० अशी अंतिम लढत जिंकली. विजयी संघातील खेळाडूंना जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी सन्मानित करून अभिनंदनाचा वर्षाव केला.

मुलींच्या विजयी संघात राजवी गवारे, हृदया बागरेचा, नेतल समदडिया, श्रेया गवारे, मुक्ता मुंजे, अन्वी उंबरकर, हर्षिता अजमेरे, ईश्वरी गोडसे, धनश्री रोहोम, दीक्षा दोशी, सिद्धी ढवळे, गिरिजा निर्मळ या खेळाडूंचा समावेश होता. खेळाडूंना समताचे बास्केटबॉल क्रीडा प्रशिक्षक रोहित महाले आणि इतर क्रीडा शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.

समता इंटरनॅशनल स्कूलचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे, मुख्य कार्यवाहक संदीप कोयटे, कार्यकारी संचालिका सौ. स्वाती कोयटे, उप प्राचार्य श्री.समीर अत्तार,  शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी आदींनी निवड झालेल्या संघाचे व मार्गदर्शन करणाऱ्या क्रिडा विभागाचे अभिनंदन केले. विभागीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या संघाचे सर्व स्तरातून विशेष कौतुक होत असून पुढील विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात येत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे