देश-विदेशब्रेकिंगमहाराष्ट्र

लिओ क्लब ऑफ समता (अल्फा) चा ५५ वा पद ग्रहण व शपथ विधी सोहळा उत्साहात पार पडला

कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे

लिओ क्लब ऑफ समता (अल्फा) चा ५५ वा पदग्रहण व शपथविधी सोहळा उत्साहात पार पडला

कोपरगाव : सामाजिक कार्यात नेहमीच पुढे असलेल्या लायन्स क्लब ऑफ कोपरगाव आणि लिओ क्लब ऑफ समता (अल्फा) यांच्या संयुक्त विद्यमाने ५५ वा पदग्रहण आणि शपथ विधी सोहळा नुकताच उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला. या कार्यक्रमात अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली होती.

विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व गुण व सामाजिक जाणीव निर्माण करणारा हा कार्यक्रम केवळ एक औपचारिकता नव्हे, तर त्यांचा सर्वांगीण विकास घडवणारा टप्पा आहे. लिओ क्लबच्या माध्यमातून आमच्या शाळेतील विद्यार्थी जबाबदार नागरिक म्हणून घडत आहेत हे अत्यंत अभिमानास्पद आहे. नव्याने निवडून आलेल्या सर्व लिओ पदाधिकाऱ्यांचे मी मन:पूर्वक अभिनंदन करते आणि त्यांच्या यशस्वी कार्यासाठी शुभेच्छा देते.” –  सौ. स्वाती संदीप कोयटे,
कार्यकारी विश्वस्त, समता इंटरनॅशनल स्कूल

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून एल. पी. एम. जे. एफ. लायन गिरीशजी मालपाणी, एम. जे. एफ. लायन रवींद्र गोलार आणि एम. जे. एफ. लायन संजय उबाळे उपस्थित होते. तसेच तुळसीदास खुबाणी, संदीप कोयटे, राजेश ठोळे, सुधीर डागा, संदीप रोहमारे, राम थोरे, सत्यम मुंदडा, आनंद ठोळे, सुरेश शिंदे, नरेंद्र कुरळेकर, सचिन भडकवाडे, पंकज ठोळे, भरत अजमेरा, सुमित भट्टड, प्रसाद भास्कर, शैलेश बनसोडे, आदित्य गुजराथी, जय बोरा, ओंकार भट्टड, कुशल कोठारी, पृथ्वी शिंदे यांच्यासह कोपरगाव, शिर्डी, राहाता आणि संगमनेर येथील लायन्स क्लब व लिओ क्लबचे अनेक पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

समारंभाच्या प्रमुख घटकांपैकी एक म्हणजे नवीन लिओ पदाधिकाऱ्यांची नियुक्ती. यामध्ये समता इंटरनॅशनल स्कूलचे विद्यार्थी लिओ समर राजपूत यांची अध्यक्ष, लिओ तीर्थ समदाडिया यांची उपाध्यक्ष, लिओ ईशान कोयटे यांची सचिव आणि लिओ सृष्टी वक्ते हिची कोषाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.

विद्यार्थ्यांच्या सहभागाने कार्यक्रमात उत्साहाचा माहोल निर्माण झाला होता. या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व गुण, सामाजिक भान आणि जबाबदारीची जाणीव निर्माण करण्याचा उद्देश सफल झाल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले. समता इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे, कार्यकारी विश्वस्त सौ.स्वाती संदीप कोयटे, मुख्याध्यापक समीर अत्तार व शिक्षक वृंद यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे